Taj Mahal Mystery Door : अखेर रहस्य उलगडले! ताजमहालातील बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का? भारतीय पुरातत्व खात्याचा मोठा खुलासा

ताजमहालात शिवमंदिर असून तळघरात अनेक दशकांपासून बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये हिंदू देव देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ताजमहालात कोणत्याही बंद खोल्या नाहीत. तसेच ताजमहालच्या जागी मंदिर नव्हते. ताजमहाल मध्ये कुठेही देव देवतांची मूर्ती नाही असा खुलासा भारतीय पुरातत्व खात्याने केला आहे. एका RTI ला उत्तर देताना पुरातत्व खात्याने हे स्पष्टीकरण दिले आहे.

Taj Mahal Mystery Door : अखेर रहस्य उलगडले! ताजमहालातील बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का? भारतीय पुरातत्व खात्याचा मोठा खुलासा
ताजमहाल Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 5:33 PM

आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी (Seven wonders)एक असलेल्या, ताजमहालात(Taj Mahal) अनेक दशकांपासून बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये(Mystery Door) खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का? याबाबतचे रहस्य अखेर उलगडले आहे. भारतीय पुरातत्व खात्याने(Archaeological Survey) याबाबत मोठा खुलासा केला आहे. याचिका कर्त्यांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

ताजमहालात शिवमंदिर असून तळघरात अनेक दशकांपासून बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये हिंदू देव देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ताजमहालात कोणत्याही बंद खोल्या नाहीत. तसेच ताजमहालच्या जागी मंदिर नव्हते. ताजमहाल मध्ये कुठेही देव देवतांची मूर्ती नाही असा खुलासा भारतीय पुरातत्व खात्याने केला आहे. एका RTI ला उत्तर देताना पुरातत्व खात्याने हे स्पष्टीकरण दिले आहे.

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यात ताजमहालात बंद असलेल्या २० खोल्या उडून तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. भाजपाच्या अयोध्या जिल्ह्याचे माध्यम प्रभारी डॉ. रजनीश सिंह यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.

ताजमहाल हा तेजो महाल असल्याचाही दावा

ताजमहाल हा तेजो महाल असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. याप्रकरणी सत्य संशोधन समिती गठित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ताजमहाल परिसराचे सर्वेक्षण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली होती. यानिमित्ताने ताज महालात शिवमंदिर आहे का कीहा ताजमहालच आहे, याचीही स्पष्टता येईल, असा दावाही करण्यात आला होता.

20 खोल्या उघडण्याची झाली होती मागणी

सत्य संशोधन समितीमार्फत बंद असलेल्या ताजमहालातील २० खोल्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी हिंदू मूर्ती, शिलालेख वा धर्मग्रथांतील काही पुरावे आहेत का, हेही यानिमित्ताने स्पष्ट होईल, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती . पुरातत्व विभागाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, अशा प्रकारच्या खोल्याच नसल्याचा दावा पुरातत्व विभागाने केला आहे.

ताजमहालाच्या चार मजली बांधकामात वरती आणि खालच्या बाजूला २० खोल्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे बंद आहेत. या खोल्यांत शिवमंदिर असल्याचे पीएन ओक आणि इतर इतिहासकारांचा दावा असल्याचेही सांगण्यात आले आहे. या खोल्या ताजमहाल बांधल्यापासून कधी उघडल्यात की नाही, याचीही माहिती कुणाकडे उपलब्ध नाही असेही याचिका कर्त्यांचे म्हणणे होते.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.