Covid Vaccine: लस घेतलीये, पण ती ओमिक्रॉन वेरिएंटविरोधात प्रभावी आहे का? वाचा AIIMS चे प्रमुख काय म्हणतात
कोविड विरुद्धच्या जगातील सर्व लसींचे पुनरावलोकन करावे लागेल. बहुतेक लसी स्पाइक प्रोटीन विरुद्ध एंटीबॉडीज तयार करतातच. पण, ओमिक्रॉनमध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन्स असल्याने लसींचा प्रभावी कमी असण्याची शकता आहे.
नवी दिल्लीः ओमिक्रॉन वेरिएंटच्या धोक्याबद्दल, ज्यामुळे जगातील सर्व देश चिंतेत आहेत त्यावर AIIMS चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, SARS-CoV-2 च्या नवीन प्रकाराविषयी उपलब्ध माहिती अनेक शक्यता दर्शवते, मात्र ते वैज्ञानिकदृष्ट्या तपासणे आणि सिद्ध करणे आवश्यक आहे. डॉ गुलेरिया म्हणाले की, ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन (mutations) झाल्याची नोंद आहे. स्पाइक प्रोटीनमधील म्यूटेशन्स रोगप्रतिकारक शक्ती कमी कमतरतात.
सध्या उपलब्ध असलेल्या कोविड प्रतिबंधक लसी ओमिक्रॉनविरोधात प्रभावी आहे का? असा प्रश्न जगाला पडलाय. तर, कोविड विरुद्धच्या जगातील सर्व लसींचे पुनरावलोकन करावे लागेल. बहुतेक लसी स्पाइक प्रोटीन विरुद्ध एंटीबॉडीज तयार करतातच. पण, ओमिक्रॉनमध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन्स असल्याने लसींचा प्रभावी कमी असण्याची शकता आहे, PTI शी बोलताना डॉ गुलेरिया म्हणाले.
तज्ञ असेही म्हणतात की व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकारात संरचनात्मक बदल आहेत (structural change). ज्यामुळे वायरसचा प्रसार जास्त होण्याची शक्यता वाढते.
As per Health Ministry’s guidelines, travellers from ‘countries at-risk’ will need to take COVID test post arrival & wait for results at airport
If tested negative they’ll follow, home quarantine for 7 days. Re-test on 8th day & if negative, further self-monitor for next 7 days pic.twitter.com/LQakAisNQ4
— ANI (@ANI) November 28, 2021
दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी सांगितले की या वेरिएंटने अधिक गंभीर किंवा असामान्य आजार होतो असे कोणतेही संकेत नाहीत. लस घेतल्याने व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी असते. मात्र या नवीन प्रकारासाठी, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमधले तज्ञ शेरॉन पीकॉक म्हणाले की, विद्यमान अँटी-कोविड लस नवीन वेरिएंटविरोधात किती प्रभावी आहेत हे तपासण्यात काही आठवडे जातील.
WHO ने ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. या वेरिएंटची तीव्रता कळताच अनेक देशांनी हवाईसेवा निर्बंध लावण्यास सुरुवात केलीये. वेगाने पसरणाऱ्या नवीन व्हेरीयंटमुळे, भारत सरकारने सर्व राज्यांना दक्षिण आफ्रिका आणि इतर “हाई रिस्क ” देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जलद चाचणी आणि तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या नवीन वेरिएंटची भारतात आतापर्यंत एकही केस समोर आलेली नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. खबरदारी म्हणून भारताने ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मॉरिशस, बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांना ‘high risk’ देशांच्या यादीत टाकले आहे.
हे ही वाचा