Army Chief : ‘युद्ध करावं लागलंच तर आम्हीच जिंकू’ चीनप्रश्नावर बोलताना लष्कर प्रमुखांचा सज्जड दम
Army Chief M.M. Narwane : चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मकता दाखवली आहे. पण चर्चेतून प्रश्न सुटला नाही आणि युद्ध करण्यासारखी परिस्थिती उद्भवली, तर आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील संबंध किती ताणले गेले आहेत, हे संपूर्ण जग पाहतंय. अशातच सातत्यानं चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण त्यातून नेमकं निष्पन्न काय होतंय, हा अभ्यासण्यासारखा विषय आहे. दरम्यान, आता लष्कर प्रमुख नरवणे (Army Chief M.M. Narwane) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. आपल्या वक्तव्यातून त्यांनी थेटपणे, युद्ध झालंच तर आम्हीच जिंकू…असं म्हणत चीनला दम भरला आहे. त्यामुळे भारत-चीन सीमावादाचा (India China Border Issue) प्रश्नावर आता पुन्हा एकदा देशाचं लक्ष वेधलं गेलं आहे. भारत आणि चीन यांच्यादरम्यान, बुधवारी चौदावी सैन्यस्तरावरील चर्चा पार पडली. लष्करप्रमुख एम.एम. नरवणे हे स्वतः देखील या चर्चेत सहभागी झाले होते. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुनही पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. सीमाभागातील घुसखोरी, पाकिस्तान (Pakistan) या मुद्द्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आहे.
काय म्हणाले एम.एम. नरवणे?
चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मकता दाखवली आहे. पण चर्चेतून प्रश्न सुटला नाही आणि युद्ध करण्यासारखी परिस्थिती उद्भवली, तर आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. उत्तर सीमेवरील परिस्थितीबाबत लष्कर प्रमुखांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. चर्चा हा प्रश्न सोडवण्यासाठी, वाद मिटवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहेच. पण त्यानं वाद मिटला नाही, तर युद्धातून भारताचाच विजय होईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. एएनआयनं याबाबतचा व्हिडीओदेखील आपल्या ट्विटरवरुन जारी केला आहे.
#WATCH | “War or conflict is always an instrument of last resort. But if resorted to, we will come out victorious,” says Army Chief Gen MM Naravane while answering a question regarding the situation on the northern border pic.twitter.com/s3zLt0U9S1
— ANI (@ANI) January 12, 2022
दहशतवाद खपवून घेणार नाहीच!
दरम्यान, लष्करप्रमुखांनी यावेळी पाकिस्तानलाह कडक शब्दांत सुनावलं आहे. दहशतवाद जराही खपवून घेतला जाणार नाही, असं म्हणतानाच पश्चिमेकडील सीमाभागात काय सुरु आहे, यावरही त्यांनी लक्ष वेधलं. एलओसी जवळ घुसखोरीचे प्रकार वाढे आहेत. पश्चिम सीमाभागातील नियंत्रणे रेषजवळ परिस्थिती सुधारणा होत असली, तरी तिथे दहशतवादी कारवाया वाढल्याचंही त्यांनी म्हटलंय. दहशतवाद जराही खपवून घेतला जाणार नाही, असं नरवणे यांनी म्हटलंय. तसंच जर आम्हाल भाग पाडलं, तर त्याची किंमतही वसूल करु, अशा कडक शब्दांत नरवणेंनी पाकिस्तानला इशारा दिलाय. याबाबतचा व्हिडीओ देखील एएनआयनं आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे.
पाहा व्हि४डीओ –
#WATCH | On the western front, there is an increase in the concentration of terrorists in various launch pads & there have been repeated attempts of infiltration across the LC. This once exposes the nefarious designs of our western neighbour: Army Chief Gen MM Naravane pic.twitter.com/GplRLuuUGz
— ANI (@ANI) January 12, 2022
संबंधित बातम्या :
चीनच्या कुरापती सुरुच, अरुणाचल प्रदेशच्या 15 स्थानांना चीनी भाषेत नाव, भारताची भूमिका काय?
Vladimar Putin: भारत-रशिया AK-203 करारावर स्वाक्षरी, पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यात काय चर्चा होणार?
जगाचा धोका वाढला ! चीन आकाशातून जमिनीवर कुठेही अणुबाँब टाकायला आता सक्षम, हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी