VIDEO: रावत यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डान घेतलं आणि थोड्याच वेळात संपर्क तुटला, राजनाथसिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम जशास तसा सांगितला

तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची संसदेत माहिती दिली.

VIDEO: रावत यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डान घेतलं आणि थोड्याच वेळात संपर्क तुटला, राजनाथसिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम जशास तसा सांगितला
rajnath singh
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 11:33 AM

नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची संसदेत माहिती दिली. हा अपघात नेमका कसा घडला? हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? आणि घटनेच्या चौकशीच्या संदर्भानं राजनाथ सिंह यांनी माहिती दिली.

राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती दिली. कुन्नूर एअर बेसवरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं. 12 वाजून 15५ मिनिटांने वेलिंग्टन एअरबेसला हेलिकॉप्टरला लँड करायचं होतं. कुन्नुर एअरबेसच्या एअर ट्रफिक कंट्रोलने जवळपास 12 वाजून 8 मिनिटांनी हेलिकॉप्टरशी आपला संपर्क तुटला. त्यानंतर कुन्नूर जवळ काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. त्यावेळी पळतच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मिलिट्री हेलिकॉप्टरचे अवशेषांना आग लागलेली त्यांनी पाहिली, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

दुर्घटनेत 14 पैकी 13 जणांचा मृत्यू

त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून एक मदत कार्य करणारं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी क्रॅश साईटवर जखमींना रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्या अवशेषातून जेवढ्या लोकांना काढणं शक्य होतं, तेवढ्यांना तात्काळ बाहेर काढून वेलिंग्टनच्या रुग्णालयात नेलं. मिळालेल्या माहितीनुसार त्या हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 लोकांचा मृत्यू झाला. ज्यांची मृत्यू झाला त्यात सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश होता. शिवाय त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखवीनदर सिंग लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरविंद सिंग आणि एअर फोर्स हेलिकॉप्टर क्रूसहीत आर्म्सफोर्सचे अन्य नऊ लोकांचा मृत्यू झाला. त्यात विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान, स्क्वॉन्ड्रन लिडर कुलदीप सिंग, राणा प्रताप दास, अरकल प्रदीप, हरविंदर सतपाल राय, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, बी साई तेजा आदींचा समावेश होता, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वांचे पार्थिव आज संध्याकाळी दिल्लीत आणणार

आज संध्याकाळी या सर्वांचे पार्थिव शरीर इंडियन एअर फोर्सच्या विमानाने दिल्लीत आणल्या जाणार आहे. सीडीएस रावत यांचा अंत्यसंस्कार मिलिट्री ऑनर्सनुसार केला जाईल. इतरांचाही मिलिट्री ऑनर्सनुसारच अंत्यसंस्कार केला जाईल, असं सांगतानाच ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टनच्या हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्टवर आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दुर्घटनेची चौकशी सुरू

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरींना घटना स्थळी कालच पाठवलं होतं. त्यांनी घटना स्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. काल वेलिंग्टनला जाऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसभा अध्यक्षांकडून शोक व्यक्त

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कालच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतो. पहिले सीडीएस असलेल्या रावत यांनी देशाच्या रक्षणात मूलभूत परिवर्तन आणण्यात मोठं योगदान दिलं. त्यांना देशाच्या प्रती समर्पणासाठी सदैव स्मरण केलं जाईल, असं ओम बिर्ला म्हणाले.

संबंधित बातम्या:

VIDEO | हा तोच जनरल रावतांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा Video आहे? ढगात शिरताना शेवटी काय दिसतंय?

Bipin Rawat : रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली, हेलिकॉप्टर अपघाताने सर्वोच्च नेतृत्वही गोंधळलं: संजय राऊत

Bipin Rawat : बिपीन रावत यांच्याकडून छत्रपती ताराराणींच्या इतिहासाची आपुलकीनं विचारणा, संभाजी छत्रपतींनी जागवल्या आठवणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.