Army helicopter crash : हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी

लष्करप्रमुखांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याकारणाने राजभवनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.

Army helicopter crash : हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 5:01 PM

तामिळनाडू : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत आतापर्यंत 13 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकजण गंभीर असल्याचं कळतंय. तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी झाले आहेत. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्यापतरी समोर आली नाही. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

राजनाथ सिंह उद्या संसदेत माहिती देणार

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेची सविस्तर माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत देण्याची शक्यता आहे. त्याआधी राजनाथ सिंह घटनास्थळी भेट देण्याचीही शक्यता आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही काही वेळात घटनास्थळाला भेट देणार आहेत.  तर वायुसेनाप्रमुख घटनास्थळाकडे रावाना झाले आहेत. ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

राष्ट्रपतींचा दरबार हॉल कार्यक्रम रद्द

लष्करप्रमुखांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याकारणाने राजभवनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. त्यामुळे या भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर राष्ट्रपतींनीही आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केल्याचे दिसून येत आहे.

बिपीन रावत यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला

आपघात जखमी झालेले सीडीएस बिपीन रावत यांच्या दिल्लीतील घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी सुरक्षादलाची बैठकही घेतली आहे. तसेच राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांच्या घरी भेट दिली आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे.

Army Chopper Crash : कोसळलेलं हवाई दलाचं भरवशाचं Mi-17 V5!; जाणून घ्या, काय आहेत वैशिष्ट्ये

CDS Bipin Rawat : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत, वाचा सविस्तर…

Cabinet Meeting : Omicronसह मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय, वाचा सविस्तर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.