गरीबांना 200 यूनिट वीज मोफत, वर्षभरात दोन कोटी नोकऱ्या; केजरीवाल यांच्या देशाला 10 गॅरंटी

| Updated on: May 12, 2024 | 3:05 PM

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीरनामाच जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यातून देशाला 10 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. मोदींच्या काळात चीनने भारताचा भू भाग हडपला आहे. त्याची सोडवणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी लष्कराला मोकळीक देण्यात येईल, अशी ग्वाही अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

गरीबांना 200 यूनिट वीज मोफत, वर्षभरात दोन कोटी नोकऱ्या; केजरीवाल यांच्या देशाला 10 गॅरंटी
Arvind Kejriwal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

तुरुंगातून सुटताच आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. काल रोड शो केल्यानंतर केजरीवाल यांनी आज पक्षाचा निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला. देशभरातील गरीबांना 200 यूनिट मोफत वीज देण्यात येईल. देशातील नागरिकांना वर्षभरात 2 कोटी नोकऱ्या देण्यात येतील, अशी घोषणा करतानाच केजरीवाल यांनी देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या. यावेळी त्यांनी मोदींच्या गॅरंटीची पोलखोलही केली. मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. ती कधीच पूर्ण केली नाही. दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं, तेही हवेतच विरलं. त्यांनी 2022पर्यंत बुलेट ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. तेही पूर्ण केलं नाही, असा हल्लाच अरविंद केजरीवाल यांनी चढवला.

आम्ही वीज मोफत देण्याची गॅरंटी दिली होती. शाळा उत्तम दर्जाच्या करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही ते करून दाखवलं. मोदींची गॅरंटी कोण पूर्ण करेल? कारण ते 75 वर्षाचे झाले आहेत. ते आता रिटायर होतील. त्यामुळे त्यांची गॅरंटी भाजपमधून कोणीच पूर्ण करणार नाही. या गॅरंटी केजरीवाल यांनाच पूर्ण करायच्या आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले,

प्रत्येक मोहल्ल्यात मोहल्ला क्लिनिक असेल

एखाद्या देशात लाखो लोक अशिक्षित असतील तर याचा अर्थ शिक्षणाचं धोरण कुठं तरी चुकतंय. असं असेल तर देश पुढे जाणार नाही. देशातील जनता स्वस्थ असेल तर देशाचा विकास होईल. एखादा पंतप्रधान देशाला पुढे नेऊ शकत नाही. देशाची जनताच देशाला पुढे घेऊन जात असते. आज देशातील सरकारी रुग्णालये घाणेरड्या अवस्थेत आहेत. आमची सत्ता आली तर देशातील प्रत्येक मोहल्ल्यात मोहल्ला क्लिनिक असेल, असं केजरीवाल म्हणाले.

आपची गॅरंटी…

देशात 24 तास वीज दे, गरीबांना मोफत वीज देऊ

प्रत्येक गावात आणि मोहल्ल्यात दर्जेदार शाळा बनवू. देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्यावर भर

प्रत्येक गावात आणि मोहल्ल्यात मोहल्ला क्लिनिक बनवले जातील. प्रत्येक जिल्ह्यात मल्टिस्पेशालिटी रुग्णालये बनवू

देश सर्वात आधी. त्यामुळे लष्कराला पूर्ण मोकळीक देऊ. चीनच्या ताब्यातील जमीन सोडवायची आहे.

अग्निवीर योजना लष्करासाठी योग्य नाही. ही योजना बंद करू. जे आता अग्निवीर आहेत, त्यांना कायम करू, लष्करावर जेवढा खर्च करायचा तेवढा करू

स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणार

वर्षभरात दोन कोटी रोजगार देणार

भ्रष्टाचारा ही भाजपची वाशिंग मशीन आहे. दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर भ्रष्टाचारापासून मुक्ती देऊ

व्यापाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था करू, जीएसटीचं सुलभीकरण करू

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ