‘चूक EVMची नाही, लोकांच्या डोक्यातच चीप टाकण्यात आली आहे’ 5 राज्यांच्या निकालावर ओवैसींचं विधान
असदद्दुीन ओवेसी यांच्या एमआयएम पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. औवेसी यांनी एएनआयशी बोलताना मतदारांचा कौल स्वीकारत असल्याचं म्हटलंय.
हैदराबाद : उत्तर प्रदेशच्या (UP Election Result) विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi ) यांच्या एमआयएम पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. औवेसी यांनी एएनआयशी बोलताना मतदारांचा कौल स्वीकारत असल्याचं म्हटलंय. आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणं झाली नसल्याचं औवेसी म्हणाले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएमसंदर्भात (EVM) काही जणाकंडून ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्यावर औवेसी यांनी भाष्य केलं आहे. दोष ईव्हीएमचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा असल्याचं ते म्हणाले. काही राजकीय पक्ष त्यांचं अपयश लपवण्यासाठी ईव्हीएम ईव्हीएमचा गजर आहेत. मात्र, मी 2019 मध्येही सांगितलं होतं की चूक ईव्हीएमची नाही लोकांच्या डोक्यात टाकण्यात आलेल्या चिपचा हा परिणाम आहे. हे भाजपला यश मिळालंय पण ते 80-20 चं यश आहे. आम्ही चांगलं काम केलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना काम करत राहा, असा संदेश देत असल्याचं ओवैसी म्हणाले.
पाहा व्हिडीओ
कार्यकर्त्यांनी मेहनत केली पण अपेक्षेप्रमाणं यश नाही
असदुद्दीन ओवेसी यांनी जनतेनं भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला आगे. मी लोकांच्या निर्णयाचं स्वागत करतो. एमआयएमचा पक्ष प्रमुख म्हणून उत्तर प्रदेशातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानतो, असं ओवेसी म्हणाले. ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचा ऋणी आहे. आम्हाला आता यश आलं नसलं तरी आम्ही पुन्हा मेहनत करु, असं ओवेसी म्हणाले.
उत्तर प्रदेशात एमआयएमला खातं उघडता आलं नाही
बिहार प्रमाणं असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत देखील उमेदवार उभे केले होते. बिहारमध्ये एमआयएमला यश मिळालं होतं. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत एमआयएमला एका जागेवर देखील विजय मिळवता आला नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार देखील झाला होता.
इतर बातम्या:
राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचं कामकाज घेतलं काढून, दुसरा आयोग स्थापन होणार?
जयंत पाटील भाजपला म्हणतात रुको, जरा सबर करो, उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा चुकीचा