ओवैसी म्हणतात, योगींना मुख्यमंत्री नाही होऊ देणार, आदित्यनाथांनी चॅलेंज स्वीकारलं, यूपीचा फड पेटला

उत्तर प्रदेश विधानसभेचा आखाडा गाजायला लागला आहे. ओवैसी आणि योगी आदित्यनाथ एकमेकांना आव्हान देतायत. ओवैसींनी ट्विट करत म्हटलंय की, उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आम्ही 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत.

ओवैसी म्हणतात, योगींना मुख्यमंत्री नाही होऊ देणार, आदित्यनाथांनी चॅलेंज स्वीकारलं, यूपीचा फड पेटला
असदुद्दीन ओवेसी, योगी आदित्यनाथ
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 10:49 AM

नवी दिल्ली : 2022 मध्ये म्हणजे आणखी वर्षभरात देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्या तयारीला भाजपासह काही पक्ष लागल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी (UP Assembly Elections) हिंदू-मुस्लिम मतांचं ध्रूवीकरण करण्याचा प्रयत्न आतापासून झालेला दिसतोय. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin Owaisi) आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना आव्हान दिलंय आणि ते आव्हान त्यांनी स्वीकारलंय.

योगी आदित्यनाथ यांना कुठल्याच स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री होऊ देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञाच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केलीय. योगी आदित्यनाथ यांनीही, ओवैसी हे मोठे नेते असून त्यांचं आव्हान स्वीकारत असल्याचं म्हणाले. एवढच नाही तर एका टीव्ही चॅनल्सशी बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, यूपीत यावेळेसही भाजपचंच सरकार बनणार आणि त्यांना कुणी आव्हान देऊ शकत नाही. औवेसी हे मोठे नेते आहेत, पण यूपीत भाजपा मुल्य आणि मुद्यांच्या आधारावर निवडणूक लढवते. असं असतानाही जर ओवैसी आव्हान देणार असतील तर ते स्वीकारतो असही आदित्यनाथ म्हणाले.

100 जागा लढवण्याची घोषणा

बिहार विधानसभेला ओवैसींच्या पार्टीला चांगला यश मिळालं. बंगालमध्ये ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. पण यूपीत मुस्लिमांच्या संख्या पहाता, मोठ्या यशाची एमआयएमला अपेक्षा आहे. त्यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) नं छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. तसच असदुद्दीन औवेसींनी 100 जागा लढवणार असल्याची घोषणा केलीय. तसच ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वात सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसारख्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. ओवैसींनी ट्विट करत म्हटलंय की, उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आम्ही 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. तसच पार्टीनं उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरु केलीय. एवढच नाही तर उमेदवारी अर्जही जारी केलेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.