कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती

कपिल सिब्बल यांच्या या कृतीमुळं देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असं गेहलोत म्हणाले. (Ashok Gehlot said there is no need for Mr Kapil Sibal to mentioned our internal issue in Media )

कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 8:02 PM

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा साधला आहे.  गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांना पक्षांतर्गत बाब माध्यमांमध्ये मांडण्याची गरज नव्हती, अशा शब्दांत निशाणा साधला आहे. कपिल सिब्बल यांच्या या कृतीमुळं देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असं गेहलोत म्हणाले. अशोक गेहलोत यांनी एका पाठोपाठ 5 ट्वीट केली आहेत. (Ashok Gehlot said there is no need for Mr Kapil Sibal to mentioned our internal issue in Media )

बिहारमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कपिल सिब्बल यांनी “अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नसल्याचे म्हटले होते”.

अशोक गेहलोत यांनी काँग्रेसनं यापेक्षा खडतर परिस्थिती पाहिल्याचे सांगितले. गेहलोत यांनी 1969, 1977, 1989, 1996 मध्ये पक्षाची स्थिती खराब झाली होती, असे स्पष्ट केले. मात्र, मजबूत वैचारिक पाया, पक्षाचा कार्यक्रम, धोरण, केंद्रीय नेतृत्वावर ठाम विश्वास याच्या जोरावर लोकांनी पुन्हा काँग्रेसला स्वीकारलं होतं, असं सांगितले.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रत्येक संकटातून मार्ग काढत त्यावर मात करत आलो आहोत. 2004 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार स्थापन केले होते, याची आठवण अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांना करुन दिली.

निवडणुकीतील पराभवासाठी वेगळी कारणं असतील. मात्र, प्रत्येक वेळी काँग्रेसनं उभारी घेतली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पक्षनेतृत्वावर ठाम विश्वास असल्यामुळे हे शक्य झाले आहे, असं गेहलोत म्हणाले.

अशोक गेहलोत यांनी संपूर्ण भारताला एकत्र ठेवणारी काँग्रेस हीच एकमेव पार्टी आहे, असं म्हटलं. काँग्रेसच देशाला एकात्मिक विकासकडे नेऊ शकते, असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

कपिल सिब्बल यांची भूमिका

बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली.

मुळात आपली घसरण होत आहे, ही बाब काँग्रेसने सर्वप्रथम स्वीकारायला पाहिजे. आपले कुठे चुकतेय, हे काँग्रेसला पक्के ठाऊक आहे. मात्र, त्याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील, अशी भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

‘महागठबंधनसाठी काँग्रेस बाधा, बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनीकला गेले’, राजद नेते शिवानंद तिवारींचा घणाघात

(Ashok Gehlot said there is no need for Mr Kapil Sibal to mentioned our internal issue in Media )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.