रेल्वे दुर्घटनेवर ममता बॅनर्जी यांनी अनेक सवाल केले उपस्थित; रेल्व मंत्री असतानाची करुन दिली आठवण
'कोरोमंडल एक्स्प्रेस ही देशातील सर्वोत्तम ट्रेन असूनही त्याचा यावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. मी रेल्वेमंत्री असताना माओवाद्यांनी बिहारमध्ये अपघाताचा कट रचला होता, त्याचा तपास मी सीआयडीकडे सोपविला होता, दुर्दैवाने आजपर्यंत त्यातून कोणताही निकाल स्पष्ट लागला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बालासोर : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शनिवारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी अपघातग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अपघातानंतर मृतांची आणि जखमींविषयी भीतीही व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांनी 500 हून अधिक मृत्यूची शक्यताही वर्तवली जात आहे. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचा मुद्दा फेटाळून लावला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, सरकारी आकडेवारीनुसार 238 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रात्री पर्यंत मृतांचा आकडा 288 वर पोहोचला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अपघातानंतर रेल्वे मंत्र्यावर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, याबाबत आम्ही पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सध्या या गोष्टीवर राजकारण करण्याची वेळ नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
याबाबत अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ मदत करण्याचा सरकारव विचार करत असल्याचेही रेल्वे मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तर त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी सांगितले की, या शतकातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असून त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे.’ असा सल्ला त्यांनी रेल्वे मंत्र्यांना दिला आहे.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, “मी रेल्वे मंत्री असताना मी अँटी-कॉलिजन सिस्टीम बसवायला सुरुवात केली आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले.” त्यांनी दावा केला की, केरळ, बेंगळुरू आणि ओडिशा येथून मोजकेच प्रवासी होते, तर बहुतांश प्रवासी हे पश्चिम बंगालचे होते.
मात्र ‘कोरोमंडल एक्स्प्रेस ही देशातील सर्वोत्तम ट्रेन असूनही त्याचा यावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. मी रेल्वेमंत्री असताना माओवाद्यांनी बिहारमध्ये अपघाताचा कट रचला होता, त्याचा तपास मी सीआयडीकडे सोपविला होता, दुर्दैवाने आजपर्यंत त्यातून कोणताही निकाल स्पष्ट लागला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.