विधानसभेत नमाज पठणासाठी मिळत होता 2 तासांचा ब्रेक, आता 1937 सुरु असणारी प्रथा बंद

आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजासाठी ब्रेक देण्याचा ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.

विधानसभेत नमाज पठणासाठी मिळत होता 2 तासांचा ब्रेक, आता 1937 सुरु असणारी प्रथा बंद
cm himanta sarma
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 4:34 PM

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 1937 सुरु असणारी प्रथा बंद करण्याचा हा निर्णय आहे. शुक्रवारचा नमाज अदा करण्यासाठी आसाम विधानसभेत दोन तासांची सुट्टी मिळत होती. आता ही सुट्टी यापुढे मिळणार नाही. आसाम विधानसभेत ही प्रथा मुस्लिम लीगचे सदस्य सय्यद सादुल्लाह यांनी सुरू केली होती. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी आणि आमच्या आमदारांचे आभार मानतो.

ब्रिटिशकालीन परंपरा अखेर रद्द

आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजासाठी ब्रेक देण्याचा ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे आसाममध्ये ब्रिटिशकालीन परंपरा संपली आहे.

आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला. भाजप आमदार बिस्वजित फुकन यांनी सांगितले की, भारतात ब्रिटीश काळापासून आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी सुट्टी दिली जात होती. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा ब्रेक दिला जात होता. ज्यामध्ये मुस्लिम आमदार दर शुक्रवारी नमाज अदा करत असत. मात्र आता हा नियम आता बदलण्यात आला आहे.

आता असा होणार बदल

लोकसभा, राज्यसभा आणि इतर राज्यांतील विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय नाही. यामुळेच आसाम विधानसभेत सुरु असलेली ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या नियमामुळे सोमवार ते गुरुवारी आसाम विधानसभेचे काम सकाळी 9:30 वाजता सुरु होत होते. परंतु शुक्रवारी सकाळी 9 वाजता काम सुरु होत होते. आता ही परंपरा बंद करण्यात आल्यामुळे शुक्रवारीसुद्धा सकाळी 9:30 वाजता विधानसभेचे काम सुरु होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.