आसाममध्ये पुराचा हाहा: कार, 62 जणांचा मृत्यू, 32 जिल्ह्यात पाणीच पाणी…
सध्या पावसाचा जोर वाढतोय. अश्यात आता आसाममध्ये पूर आलाय. तसंच भूस्खलनाच्याही घटना घडत आहेत. यात आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाम : सध्या पावसाचा जोर वाढतोय. अश्यात आता आसाममध्ये पूर (Assam Flood) आलाय. तसंच भूस्खलनाच्याही घटना घडत आहेत. यात आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासात आठ जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बारपेटा आणि करीमगंज जिल्ह्यात प्रत्येकी दोन, दारंग, हैलाकांडी, नलबारी आणि सोनितपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक जण अद्याप बेपत्ता आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या मते, आतापर्यंत 62 लोकांपैकी 51 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. तर 11 जण भूस्खलनामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत.
Pray for Assam.#assamfloods #AssamFloods2022 pic.twitter.com/5XHdSfD8ng
— Md Aminur Rahman (@aminurrahmanar) June 18, 2022
कुठे-कुठे पुरस्थिती?
बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, बोंगाईगाव, कचार, दारंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा हासाओ, गोलपारा, होजाई, कामरूप, कामरूप, कार्बी आंगलाँग पश्चिम, करीमगंज, कोकराज, 32 जिल्ह्यांतील सुमारे 31 लाख लोक पुरामुळे अस्वस्थ आहेत. तसंच लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, शिवसागर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया, उदलगुरी या भागात महापुराचा फटका बसला आहे.
#AssamFloods Rail link between #NewTinsukiaRailwayStation and #Guwahati has been snapped due to breach between Jugijan and Chaparmukh section. @RailNf @drm_tsk pic.twitter.com/pY3bsvQY4M
— Oxomiya Jiyori ?? (@SouleFacts) June 18, 2022
बारपेटा जिल्ह्यात 7.31 लाखांहून अधिक लोक बाधित आहेत. दारंग जिल्ह्यात 3.54 लाख, बजालीमध्ये 3.52 लाख, नागावमध्ये 2.41 लाख, गोलपारामध्ये 2.21 लाख, कामरूपमध्ये 2.18 लाख, नलबारीमध्ये 1.65 लाख, लाखीमपूरमध्ये 1.14 लाख लोक बाधित झाले आहेत. , होजईमध्ये 1.25 लाख आणि बोंगईगावमध्ये 1.13 लाख लोकांच्या जगण्यावर या पुराचा परिणाम झाला आहे.
This explains everything. this explains how tiny and powerless we humans are infront of nature.#assamfloods pic.twitter.com/evomBwC1LR
— Dhanmani kalita (@likumoni1) June 18, 2022
जनावरांचे हाल
या पुरामध्ये 25.54 लाखांहून अधिक जनावरांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या 24 तासात भारतीय लष्कर, NDRF, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यामातून बचाव कार्य सुरू आहे. या बचाव कार्यातून 9,102 जणांची सुटका करण्यात आली आहे.
In your rush to politicise an Army Reform, in your rush to hate someone, in your rush to unify the opposition and in your rush to divide the opposition; don’t forget #Assam and its people. #AssamFloods pic.twitter.com/3v99nYipbx
— Anindya (@AninBanerjee) June 19, 2022
शिवाय आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि शेजारील देश भूतानमध्ये मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. अनेक नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली, जिया-भरली आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे.
Pray for Assam.#assamfloods #AssamFloods2022 pic.twitter.com/5XHdSfD8ng
— Md Aminur Rahman (@aminurrahmanar) June 18, 2022