Assembly Election 2022 : स्वतंत्र भारतात नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान, अमित शाहांचा दावा

अमित शाह यांनी गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेशात भाजप सरकार बनवणार असल्याचा दावा केलाय. तर पंजाबमध्ये भाजपची स्थिती अधिक चांगली होईल. पंजाबमध्ये भाजपनं युतीतील मोठा पक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे, असंही शाह यांनी म्हटलंय.

Assembly Election 2022 : स्वतंत्र भारतात नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान, अमित शाहांचा दावा
अमित शाह यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:04 PM

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2022) रणधुमाळी आता संपत आलीय. उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात मतदान बाकी आहे. अशावेळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेशात भाजप सरकार बनवणार असल्याचा दावा केलाय. तर पंजाबमध्ये भाजपची स्थिती अधिक चांगली होईल. पंजाबमध्ये भाजपनं युतीतील मोठा पक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे, असंही शाह यांनी म्हटलंय.

‘योगी सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेत मोठा बदल घडवला’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, उत्तर प्रदेशात योगी सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला. राज्यातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यात 30 ते 70 टक्के घट झालीय. सर्व माफिया सध्या तुरुंगात आहेत. महिला आणि मुली आता उत्तर प्रदेशात सुरक्षित आहेत. त्याचबरोबर बूथ स्तरापासून पंतप्रधान मोदी आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते एक लय, एक गती आणि एक दिशेनं वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क ठेवतात. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या निवडणूक एका नव्या आणि विचित्र प्रकारची प्रचार मोहीम पाहायला मिळाली. देशात जवळपास साडे सात वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार आहे, असंही शाह यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय.

पंतप्रधान मोदी स्वतंत्र भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान – शाह

पाच राज्यांच्या निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता स्वतंत्र भारतातील कोणत्याही पंतप्रधानांच्या लोकप्रियतेपेक्षा अधिक दिसून आली. याचा फायदा भाजपला या निवडणुकीत होईल. मोदी हे स्वत: उत्तर प्रदेशातून खासदार आहेत. काशीमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला, तेव्हा जनता आपल्यासाठी काम करणाऱ्या नेत्याचं कशाप्रकारे स्वागत करते, याचं उत्तम उदाहरण आपल्याला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं, असा दावाही अमित शाह यांनी केलाय.

‘आज उत्तर प्रदेशात लोकशाही नांदतेय’

‘उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच लोकशाहीचं खरं चित्र पाहायला मिळालं. जातीवाद, परिवारवाद, तुष्टीकरण या तिन्ही गोष्टी संपवत आज आपण उत्तर प्रदेशात लोकशाही नांदताना पाहतोय. उत्तराखंडमध्ये पाच वर्षाच्या कार्यकाळात भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. वन रँक वन पेन्शन योजनेतून उत्तराखंडमधील सर्व रिटायर्ड सैनिकांना लाभ झाला’, असंही शाह यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात भाजपला मोठा झटका, रीटा बहुगुणा जोशींच्या मुलाचा समाजवादी पार्टीत प्रवेश!

Video : वाराणसीत दिसला पंतप्रधान मोदींचा खास अंदाज; काशी विश्वनाथाचं दर्शन, ‘डमरू’ही वाजवला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.