Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant kishore | पाच राज्यात विधानसभा निवडणूक, कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी काय?

Prashant kishore | लवकरच पाच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीआधीच सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. या निवडणुकीत कोणाची बाजू सरस असेल? कोण प्रभावी ठरणार? त्याबद्दल जाणून घ्या.

Prashant kishore | पाच राज्यात विधानसभा निवडणूक, कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी काय?
prashant kishore prediction
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 8:22 AM

नवी दिल्ली : पुढच्यावर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्याआधी यावर्षी काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे काय निकाल लागतात? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. सध्या सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक सेमीफायनल असणार आहे. विद्यमान राजकीय परिस्थितीत देशात दोन मोठ्या आघाड्या आकाराला आल्या आहेत. काँग्रेस प्रणीत इंडिया आणि भाजपा प्रणीत एनडीए. लोकसभा निवडणुकीला या दोन आघाड्यांमध्ये मुख्य सामना रंगणार आहे. देशातील बहुतांश पक्ष या दोन्ही आघाड्यांचे घटक आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छतीसगढ़, तेलंगण आणि मिजोरममध्ये सामना होईल.

या राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल काय असणार त्यावरुन देशाचा मूड लक्षात येईल. इंडिया की, एनडीए कोणाची बाजू सरस आहे? कोणाच्या बाजूला जास्त जनाधार आहे? कुठले मुद्दे लोकसभेला प्रभावी ठरणार? ते राजस्थान, मध्य प्रदेश, छतीसगढ़, तेलंगण आणि मिजोरमच्या निवडणुकीतून लक्षात येईल. पुढच्या काही महिन्यात या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि तेलंगणमध्ये BRS ची सत्ता आहे. पुढच्या काही दिवसात या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. भाजपा आणि काँग्रेस हे भारतीय राजकारणातील दोन मुख्य पक्ष निवडणुकीच्या मोडमध्ये आहेत. दररोज नवनवीन घोषणा सुरु आहेत. निवडणुकीचा माहोल आहे, या दरम्यान जन सुराजचे प्रमुख आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काही अंदाज वर्तवले आहेत.

कोण जिंकणार? कोण हरणार?

निवडणुकीत कोणाची बाजू वरचढ राहील, त्या बद्दल प्रशांत किशोर यांनी भविष्य वर्तवल आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपा, काँग्रेस, जेडीयू आणि तृणमुलसह अनेक पक्षांसोबत काम केलं आहे. त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अलीकडेच बिहार भ्रमण करताना प्रशांत किशोर मुजफ्फरपूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी टाइम्स नाऊ वाहिनीला एक मुलाखत दिली. विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मोकळेपणाने उत्तर दिली. प्रशात किशोर यांचा अंदाज काय?

“राजस्थानमध्ये भाजपा थोडी पुढे आहे. पण मागच्या काही महिन्यात काँग्रेसने इथे आपली पकड घट्ट केली आहे. तरीही भाजपाच पुढे आहे. मध्य प्रदेशमध्ये अटी-तटीचा सामना होईल. पण मार्जिनने मी भाजपाला थोडा एडवांटेज देईन. छत्तीसगडमध्ये सुद्धा टफ फाईट सामना होईल. पण इथे काँग्रेस पुढे आहे. तेलंगणमध्ये बीआरएस विजय मिळवेल” असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तवला.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.