Assembly Election Result 2021: कोणीही जिंको, काही फरक पडत नाही; कपिल सिब्बल यांचं मोठं विधान

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू झाली आहे. (Whoever wins elections such victories are pyrrhic, says Kapil Sibal)

Assembly Election Result 2021: कोणीही जिंको, काही फरक पडत नाही; कपिल सिब्बल यांचं मोठं विधान
Kapil Sibal
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 10:13 AM

कोलकाता: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोठं विधान केलं आहे. कोणीही जिंको, काही फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. (Whoever wins elections such victories are pyrrhic, says Kapil Sibal)

कपिल सिब्बल यांनी ट्विट करून हे विधान केलं आहे. आज लोकांचा जीव वाचवण्याखेरीज दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. आज निकाला दिवस आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे.

कोर्टाकडूनही गंभीर दखल

देशात पाच राज्यांची निवडणूक असतानाच कोरोनाचं संकटही वाढलं आहे. देशातील बहुतेक रुग्णालयात ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची संख्याही कमी झाली आहे. लोक ऑक्सिजन मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे. दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही करत आहे. कोर्टानेही या संकटाची गंभीर दखल घेऊन सरकारला फटकारले आहे.

मृतांचा आकडा वाढला

ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तिथली कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. बंगालमध्ये गेल्या 24 तासात 17,411 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 96 कोरोना बळीचा मृत्यू झाला आहे. बंगालमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8,28,366 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 11,344 वर गेला आहे.

आसाममध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,197 नवे रुग्ण सापडले असून या चोवीस तासात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आंकडा 1,307 वर गेला आहे. केरळमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये 37,199 नवे रुग्ण सापडले असून गेल्या चोवीस तासात 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णांची एकूण संख्या 15,71,183 झाली असून मृतांची संख्या 5,308 वर गेली आहे. तामिळनाडूत गेल्या 24 तासात एकूण 18,692 नवे रुग्ण सापडले आहे. तामिळनाडूत गेल्या चोवीस तासात 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीत गेल्या 24 तासात 1,195 नवे रुग्ण आढळले असून 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीतील कोरोना रुग्णांची संख्या 58,622 वर पोहोचली असून मृतांचा आकडाही 805 वर गेला आहे. (Whoever wins elections such victories are pyrrhic, says Kapil Sibal)

संबंधित बातम्या:

5 State Assembly Election Results 2021 LIVE: 5 State Assembly Election Results 2021 LIVE : बंगालमध्ये तृणमूल-भाजपमध्ये काँटे की टक्कर, आसाममध्ये मुख्यमंत्री सोनोवाल पिछाडीवर

West Bengal Election Results 2021 LIVE: ममता बॅनर्जींना मोठा धक्का; नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारींची आघाडी

Assembly Election results 2021: ‘पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल

(Whoever wins elections such victories are pyrrhic, says Kapil Sibal)’

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.