वनसाईड विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला भाजपने कसा दिला धोबीपछाड

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार आलं आहे. तर, हरियाणात तिसऱ्यांदा भाजपनं बाजी मारली. वनसाईड विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला हरियाणात मोठा झटका बसलाय. हरियाणा भाजपनं नेमकं कसं जिकलं, पाहुयात TV9चा स्पेशल रिपोर्ट.

वनसाईड विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला भाजपने कसा दिला धोबीपछाड
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 8:35 PM

हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल लागला आणि मुख्य नजरा असलेल्या हरियाणात भाजपचा मोठा विजय झाला. तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या खात्यात गेलं. मात्र हरियाणात 60 हून अधिक जागांचा दावा करणाऱ्या काँग्रेसला मोठा फटका बसला. 90 विधानसभेच्या हरियाणात भाजपनं स्पष्ट बहुमताच्या पुढे जात 48 जागा जिंकल्या. तर काँग्रेसचे 37 आमदार निवडून आले आहेत. आयएन एलडीचे 2 तर 3 अपक्ष आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे 2019च्या तुलनेत भाजपच्या 8 जागा अधिक निवडून आल्यात. हरियाणात भाजपच्या विजयाची मुख्य कारणं काय राहिलीत त्यावर एक नजर टाकुयात.

हरियाणात भाजपनं जातीय समीकरण साधलं, काँग्रेसनं जवळपास 21 % असलेल्या जाट आणि दलित समुदायावर भर दिला तर भाजपनं 35 % ओबीसींसह सवर्ण मतदारांवर खास मोर्चा वळवला. दलित आणि जाट मतदारांवर निर्भर मायावतींच्या बसपाची आघाडी आणि जेजेपी आघाडी अशा 2 वेगवेगळ्या आघाड्यांमुळं मतांचं विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसला. ऐन निवडणुकीच्या काही महिन्यांआधी मुख्यमंत्री बदलून ओबीसी चेहरा देत भाजपनं अॅन्टिइकंबन्सी कमी केली. 5 महिन्याआधीच मनोहर लाल खट्टरांच्या ऐवजी नायब सिंग सैनींना मुख्यमंत्री करुन भाजपनं बाजी पलटली.

जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला बहुमत

जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षेप्रमाणं फारुक अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळालंय. कलम 370 हटवल्यानंतर, पहिल्यांदाच जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. ज्यात जम्मू काश्मीरच्या जनतेनं नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला पाठींबा दिला.

जम्मू काश्मीरच्या 90 विधानसभेच्या जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला 48 जागा मिळाल्यात. ज्यात नॅशनल कॉन्फरन्सला 42 जागा आणि काँग्रेसचे 6 आमदार निवडून आलेत. भाजपचे 29 आमदार निवडून आलेत. मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीला 3 जागा मिळाल्यात. जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सला 1 जागा आणि इतरांना 7 जागा मिळाल्यात.

ओमर अब्दुलाच मुख्यमंत्री होतील – फारुख अब्दुला

बहुमत मिळाल्यानंतर फारुक अब्दुल्लांनी, त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्लाच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणाही केली. याआधी 2014 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारनं कलम 370 हटवलं. आता जम्मू काश्मीरच्या जनतेनं नॅशनल कॉन्फन्स आणि काँग्रेसच्या बाजूनं मतदान केलं.

हरियाणा आणि जम्मू काश्मीर या 2 निवडणुकांपैकी हरियाणात काँग्रेस भाजपची हॅटट्रिक रोखणार असे दावे केले जात होते. मात्र, हरियाणाच्या जनतेनं भाजपलाच निवडून दिलेय.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं.
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी.
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार.
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार.