CCTV Footage | मद्यधुंद रेल्वे स्टाफने मोबाईल पाहण्याच्या तंद्रीत लोकल डेड एण्डला धडकवली

मथुरा जंक्शन येथे मंगळवारी रात्री लोकल ट्रेन बफरला तोडून फलाटावर गेल्याचा अपघात घडला होता. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून मद्यधुंद रेल्वे स्टाफने मोबाईल पहाण्याच्या नादात हा अपघात केल्याचे उघड झाले आहे.

CCTV Footage | मद्यधुंद रेल्वे स्टाफने मोबाईल पाहण्याच्या तंद्रीत लोकल डेड एण्डला धडकवली
emu accident Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 9:26 AM

उत्तर प्रदेश | 28 सप्टेंबर 2023 : उत्तरप्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी लोकल बफर डेड एण्ड तोडून फलाटावर घुसल्याचा धक्कादायक अपघात घडला होता. या प्रकरणाच्या तपास करण्यात आला असून संयुक्त तपासात रेल्वेचा स्टाफ मद्यधुंद अवस्थेत मोबाईलवर व्हिडीओ कॉल करण्यात बिझी असल्याने हा अपघात घडल्याचे उघडकली आले आहे. या प्रकरणातील या रेल्वे स्टाफचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात मद्यधुंद स्टाफसह पाच जणांना सस्पेंड केले आहे.

उत्तरप्रदेशातील मथुरा जंक्शन येथे ट्रेन क्रमांक 04446 शकुबस्ती मथुरा लोकल मथुरा जंक्शनवर मंगळवारी रात्री 10.50 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 A वर आली. त्यानंतर पाच मिनिटांत ही लोकल अचानक सुरु होऊन बफर एण्डला धडकली. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. परंतू रेल्वे या प्रकरणाची संयुक्ती चौकशी केली तेव्हा यात हलगर्जीपणा आढळला. या प्रकरणात या लोकल ड्रायव्हर केबिनचा व्हिडीओ बाहेर आला आहे.

या अपघातग्रस्त लोकलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात रेल्वेच्या स्टाफने जेव्हा या ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल सुरु होता. त्या नादात त्याने थ्रोटलवर बॅग ठेवल्याने लोकल पुढच्या दिशेने निघाली आणि बफर एण्ड तोडून फलाट क्रमांक 2 वर गेली. त्यामुळे ओएचई तुटल्याने वीजपुरवठा देखील खंडीत झाला. या प्रकरणी रेल्वे स्टाफ सचिन याची मद्य चाचणी घेतली असता तो त्याच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण 47mg / 100 ml असे माईल्ड आढळले आहे. अल्कोहोलचे नेमके प्रमाण किती आहे हे समजण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमूने  घेण्यात आले असल्याचे आग्रा रेल्वे डीव्हीजनच्या सूत्रांनी सांगितले.

येथे पाहा व्हिडीओ –

तांत्रिक कर्मचाऱ्याऐवजी भलत्याला पाठविले

या प्रकरणात डीव्हीजनल रेल्वे मॅनेजर तेज प्रकाश अगरवाल यांनी सचिन याच्या सह पाच जणांना सस्पेंड केले आहे. इतर रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हरभजन सिंग, ब्रजेश कुमार आणि कुलजीत हे तांत्रिक कर्मचारी आणि गोविंग हरी शर्मा हे लोको पायलट यांचा समावेश आहे. या प्रकरणात आम्ही पाच जणांना सस्पेंड केले आहे. या प्रकरणातील जॉईंट रिपोर्टमध्ये म्हटले आहे की डीटीसी कॅब ( इंजिन ) ची चावी सर्वसामान्यपणे तांत्रिक कर्मचाऱ्याने कलेक्ट करायची असते. या घटनेत त्यांनी सचिन या स्टाफला पाठविल्याचे त्रूटी उघडकीस आली आहे.

Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.