Aditya L1 | 6 जानेवारीला आदित्य सूर्याच्या L1 पॉइंटवर किती वाजता पोहोचणार? ISRO कडून वेळ जाहीर
Aditya L1 Mission| भारताची पहिली सूर्य मोहिम सुरु आहे. आदित्य L1 नवीन वर्षात 6 जानेवारीला आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचेल. इस्रोचे चीफ एस.सोमनाथ यांनी गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. त्यांनी चांद्रयान-3 मिशनमधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरबद्दल अपडेट दिली.

Aditya L1 | भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच पहिल सौर मिशन आदित्य L 1 वर लवकरच आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचणार आहे. नवीन वर्षात 6 जानेवारीला आदित्य सूर्याच्या L 1 म्हणजे लॅग्रेज पॉइंटवर पोहोचेल. ISRO चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी आदित्य किती वाजता पोहोचणार त्याची वेळ सुद्धा जाहीर केलीय. भारताची ही पहिलीच सूर्य मोहिम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सुद्धा आदित्य L 1 मिशनबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. यावर्षी इस्रोच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान-3 मिशन यशस्वी करुन दाखवलं. भारताच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरलं. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार जगातील पहिला देश ठरला. त्यामुळे आदित्य L 1 मिशनबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे.
आदित्य L1 मिशन यावर्षी 2 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आलं होतं. या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे. वैज्ञानिकांची आदित्या L 1 वर पूर्णपणे नजर आहे, असं गुरुवारी एस सोमनाथ यांनी मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलं. आता आदित्य यानाची इंजिन ऑन केले जातील. जेणेकरुन यानाला हॅल ऑर्बिटमध्ये प्रवेश करता येईल. लॅग्रेज पॉइंट तो बिंदू आहे, जिथे पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय असतं. 6 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजता आदित्य यान L1 पॉइंटवर पोहोचून आपल काम सुरु करेल.
मिशनमधून काय साध्य होणार?
आदित्य L1 च्या सर्व पेलोडच परीक्षण करण्यात आलय असं इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं. सर्व पेलोड व्यवस्थित काम करतायत व चांगला डेटा देतायत असं ते म्हणाले. आदित्य L1 पॉइंटवर पोहोचल्यावर त्याच स्थान निश्चित केलं जाईल. आदित्य L1 मधील उपकरण व्यवस्थित काम करतील, तो पर्यंत माहित मिळत राहील, असं सोमनाथ म्हणाले. या मिशनमधून सूर्यावर येणारी वादळं, सौर कोरोना आणि अवकाश हवामानाची अनेक रहस्य उलगडली जातील.
विक्रम लँडरला पुन्हा जाग येईल का?
चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने डेटा एकत्र करण्यासाठी योगदान दिलं. त्यानंतर आता ते चांगली निद्रा घेत आहेत. आता ते पुन्हा कधी उठणार नाहीत. आम्हाला अशी अपेक्षा होती की, ते जागे होतील. पण असं होऊ शकलं नाही, असं एस. सोमनाथ म्हणाले.