6 महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज, नवऱ्याचा 25 व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू, मग बायकोच्या कृतीने सगळ्यांनाच धक्का
बायकोने जे पाऊल उचललं त्याने सगळ्यांना जबर धक्का बसला. दोघांनी सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. असं काही घडेल, याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
अहमदाबाद : लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या जोडप्यांनी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. त्यांच्या डोळ्यात सुखी संसाराच चित्र असतं. परस्पराच्या साथीने आयुष्य जगताना त्यांना बरच काही साध्य करायच असतं. पण काहीवेळा डाव अर्ध्यावर मोडला जातो. ज्याचा स्वप्नातही विचार केलेला नसतो, ते घडतं. त्यांच्यासाठीच नाही, आसपासच्या लोकांसाठी सुद्धा हा मोठा धक्का असतो. हे असं कसं घडू शकत? असाच प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील लीलीया तालुक्यात 12 मे रोजी अशीच धक्कादायक घटना घडली. एक जोडप्याचा आता कुठे संसार सुरु झाला होता, तितक्यात डाव अर्ध्यावर सोडून जोडीदाराने एक्झिट घेतली.
या घटनेमुळे अख्ख गाव हळहळलं
नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर तरुण मुलीने दुसऱ्याचदिवशी आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे अख्ख गाव हळहळलं. नवरा धर्मेश राठोडचा वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दोघांचा प्रेमविवाह होता. अवघ्या सहा महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.
याची माहिती दिली नव्हती
धर्मेश शेत मजूर म्हणून काम करायचा. 12 मे रोजी घरात बसलेला असताना धर्मेश अचानक कोसळला. त्याला लगेच नजीकच्या सरकारी रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. धर्मेशच्या कुटुंबातील महिलांसह त्याच्या पत्नीला याची माहिती देण्यात आली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित
दुसऱ्यादिवशी पत्नीला जेव्हा धर्मेशच्या मृत्यूबद्दल समजलं, तेव्हा तिने स्वत:च आयुष्य संपवलं. या जोडप्याच्या मृत्यूने संपूर्ण गावाला धक्का बसला. शनिवारी संध्याकाळी या जोडप्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लीलीया पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली असून ते पुढील तपास करत आहेत.