माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)यांच्या समधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi)यांनी आज आदरांजली वाहिली. त्यांनी ‘सदैव अटल’ या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री पियूष गोयल, निर्मला सितारमण आणि हरदीप सिंह पुरी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना पुष्पांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, ” आदरणी अटलजींना कोटी कोटी प्रणाम. आज जयंतीदिनी अटलजींची आठवण येतेय. त्यांची समृद्ध सेवा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. भारताला मजबूत बनण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. त्यांच्या विकासकामांचा भारतीयांवर सकारात्मक प्रभाव आहे.” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले, ‘मी अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. ते एक महान देशभक्त असून एक प्रख्यात वक्ते, अद्भूत कमी, सक्षम प्रशासक आणि एक उल्लेखनीय सुधारणावादीच्या रुपात स्वतःची ओळख निर्माण केली. अटलजींचे अमूल्य योगदान विसरणे शक्य नाही. त्यांना सादर प्रणाम.’
गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट केले. ते म्हणाले, ‘अटलजींनी कठोर तत्त्व आणि अद्भुत कर्तव्यनिष्ठेने देशात अंत्योदय आणि सुशासनाची कल्पना राबवून भारतीय राजकारणाला नवी दिला दिली. अटलजींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक दूरदर्शी निर्णय घेऊन भारताचा पाया मजबूत केला. मोदी सरकार दरवर्षी अटलजींच्या योगदानाचे स्मरण करत उत्साहान सुशासन दिन साजरा करते. सर्वांना सुशासन दिनाच्या शुभेच्छा!’
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले, भारतीय राजकारणातील आदर्श युग पुरुष कोट्यवमधी भाजप कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक तसेच माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम. देश तसेच संघटनाच्या सेवेसाठी समर्पित, युगदृष्टे अटलजी यांचे जीवन आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी झाला होता. भारतीय जनता पार्टीला यशशिखरावर पोहोचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका पार पाडली. नव्वदीच्या दशकात ते पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले. केंद्रात प्रथमच भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. पंतप्रधान पदावरील कार्यकाळात वाजपेयी यांनी देशात उदारीकरणाला प्रोत्साहन दिले. यामुळे पायाभूत सुविधा आणि विकासाला गती मिळाली.
इतर बातम्या-