अयोध्येत तातडीने पाठवण्यात आले एटीएस कमांडो आणि आरएएफचे जवान, पाहा काय आहे कारण
Ram Mandir security : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अयोध्येत मोठे गर्दी उसळली आहे. भाविकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केल्याने पोलिसांसमोरचे आव्हान वाढले आहे. वाढती गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येतील नभव्य राम मंदिरात दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांचीही धडपड सुरू आहे. मंदिरातील वाढती गर्दी पाहून एटीएस आणि आरएएफच्या जवानांना रामलला मंदिराच्या आत पाठवण्यात आले आहे. भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत कोणत्याही गोष्टी घडू नये म्हणून एटीएस कमांडो टीम आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांना मंदिरात तपासणी आणि सुरक्षेसाठी पाठवण्यात आले आहे. राम मंदिर आजपासून सर्व भाविकांसाठी खुले झाले आहे. सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागल्या आहेत.
अयोध्येत पहिल्याच दिवशी मोठी गर्दी
अयोध्येतील गर्दी पाहता आजूबाजूच्या जिल्ह्यातही पोलीस सक्रिय झाले आहेत. अयोध्येपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाराबंकी येथील पोलिसांनी भाविकांना अयोध्या धाममध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे. सर्व प्रकारच्या वाहनांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.
रामलल्लाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी एक लाख लोकं येण्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्यानंतर दरदिवशी ५० हजाराहून अधिक लोकं येण्याची शक्यता वर्तवली गेली होती.
सुमारे 500 वर्षांनंतर राम मंदिर बनवण्यात आले असून रामलल्ला येथे विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी सुमारे 8000 आमंत्रित लोकांच्या उपस्थितीत PM मोदी यांनी रामलल्लावर अभिषेक केला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 जानेवारीला राम भक्तांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
प्राणप्रतिष्ठेनंतर रामलला आता आपल्या दिव्य स्वरूपात सर्वांसमोर आले आहेत. रामललाला पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेल्या त्यांच्या स्वरूपावर आधारित अनेक दिव्य अलंकार आणि वस्त्रांनी सजवले गेले आहे.
अध्यात्म रामायण, श्रीमद वाल्मिकी रामायण, श्री रामचरितमानस आणि आळवंदर स्तोत्र यामध्ये रामाचे जसे वर्णन केले आहेत त्यानुसार रामललाचे दागिने तयार करण्यात आले आहेत.
राम मंदिरात काल अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर, रणबीर कपूर, हेमा मालिनी यांची समावेश होता. संपूर्ण अंबानी कुटुंब देखील यावेळी उपस्थित होते. या शिवाय अनिल अंबानी देखील उपस्थित होते.