Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NIA की ATS? फडणवीसच संभ्रमात?; हिरेन मृत्यू प्रकरणात दिल्लीत मोठी मागणी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या सर्व घडामोडींवर भाष्य केलं. (ats or nia? is devendra fadnavis confused on investigation agency over mansukh hiren death case?)

NIA की ATS? फडणवीसच संभ्रमात?; हिरेन मृत्यू प्रकरणात दिल्लीत मोठी मागणी
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 6:38 PM

नवी दिल्ली: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या सर्व घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासावर बोलताना मात्र फडणवीसांचा संभ्रम झालेला दिसला. एनआयएने या प्रकरणाचा तपास करावा की एटीएसने याबाबत बोलताना फडणवीस काहीशी सावध भूमिका घेताना दिसले. (ats or nia? is devendra fadnavis confused on investigation agency over mansukh hiren death case?)

देवेंद्र फडणवीस यांनी वाझेप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करताना सरकारला धारेवर धरलं. एटीएसकडे हिरेन प्रकरणाचा तपास गेल्यानंतर एटीएसने वाझेंना अटक करायला हवी होती. वाझेंना अटक करून एटीएसने त्यांना एनआएकडे द्यायला हवं होतं. पण एटीएसने तसं केलं नाही. हिरेन आणि अँटालिया प्रकरण हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. त्यामुळे हिरेन प्रकरणाचा एनआयएने तपास करावा, असं सांगतानाच एटीएसवर आमचा अविश्वास नाही असं नाही. एटीएसवर विश्वास आहे. पण ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, तशी या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे हे प्रकरण एनआयएकडे देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं.

एटीएसवर दबाव आहे का?

एटीएसकडून सुरुवातीला अॅक्शन दिसली, पण आता काहीच दिसत नाही. एटीएसने जी कारवाई करायला हवी, ती होताना दिसत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला इतके पुरावे मिळत असतील, तर माझा दावा आहे पोलिसांकडे यापेक्षा जास्त पुरावे असतील. एटीएस ही चांगली यंत्रणा आहे. ते चांगलं काम करतात. पण त्यांच्यावर दबाव आहे का? असं वाटतंय. कारण या प्रकरणात पुरावे असूनही एटीएस पाहिजे तशी कारवाई करत नाही, त्यामुळे एनआयएने या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

वाझे आणि परमबीर सिंग यांचे बॉस कोण?

एटीएस आणि एनआयएकडे टेप आहेत. त्यामध्ये वाझेने त्यांना काय काय म्हटलंय ते स्पष्ट आहे. या टेपमध्ये हिरेन आणि वाझे यांचं संभाषण आहे. त्याचा तपास केल्यास सर्व प्रकरणाचा उलगडा होईल, असा दावाही त्यांनी केला. एकटे सचिन वाझे इतकं मोठं कुंभाड रचू शकत नाहीत. त्यांच्यामागे कोण कोण आहेत हे बाहेर आलं पाहिजे. हे पोलीसांचं अपयश नाही तर सरकारचं अपयश आहे. वाझे आणि परमबीर सिंग यांना कोण ऑपरेट करत होतं. त्यांचे बॉस कोण आहेत, हे शोधून काढलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

वाझेंना पदावर का आणलं? चौकशी करा

छोट्या छोट्या कारणाने निलंबित झालेल्या एकाही अधिकाऱ्याला पदावर घेतलं नाही. पण उच्च न्यायालायाने निलंबित केलेल्या आणि वसईतील खंडणीप्रकरणात नाव आलेल्या वाझेंना पदावर घेतलं. त्यासाठी कोविडचं कारण दिलं. वाझेंचा भुतकाळ ठाकरे सरकारला माहित होता. तरीही सरकारने अशा व्यक्तीला इतक्या महत्त्वाच्या जागेवर बसवलं, त्यावरुन स्पष्ट होतंय की सरकारची मजबुरी होती. वाझे यांना या पदावर का बसवलं? त्यांच्याकडे असं काय होतं की सरकारची मजबुरी झाली, याचाही शोध घेतला पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवं. सरकारने वाझेंना या पदावर का आणलं, त्याचा संबंध काय हे तपास यंत्रणांना शोधावंच लागेल, अशी आमची मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं. (ats or nia? is devendra fadnavis confused on investigation agency over mansukh hiren death case?)

संबंधित बातम्या:

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; कोण आहेत नगराळे?

(ats or nia? is devendra fadnavis confused on investigation agency over mansukh hiren death case?)

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.