‘मला गृह मंत्रालयाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट द्या’, बंगालच्या मुख्य सचिवांची केंद्राकडे मागणी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर कोलकाता पासून दिल्लीपर्यंतच राजकारण प्रचंड तापलं आहे (West Bengal CS letter to Home Ministry).

'मला गृह मंत्रालयाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट द्या', बंगालच्या मुख्य सचिवांची केंद्राकडे मागणी
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 10:27 PM

कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर कोलकाता पासून दिल्लीपर्यंतच राजकारण प्रचंड तापलं आहे. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांना रिपोर्ट पाठवण्याची मागणी करत गृह मंत्रालयाच्या दिल्ली येथील कार्यालयात 14 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, याउलट बंद्योपाध्याय यांनी केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांना पत्राद्वारे घटनेचा संपूर्ण रिपोर्ट पाठवला आहे. त्याचबरोबर 14 डिसेंबरला दिल्लीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी पाठवला आहे (West Bengal CS letter to Home Ministry).

दरम्यान, या घटनेप्रकरणी राज्यपाल जगदीप धनखड यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे रिपोर्ट सुपूर्द केला आहे. या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय आणि पोलीस महासंचालक वीरेंद्र यांना 14 डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाच्या दिल्ली येथील कार्यालयात दुपारी 12 वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत (West Bengal CS letter to Home Ministry).

बंगालच्या मुख्य सचिवांनी पत्रात काय म्हटलं?

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांनी केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांना पत्र पाठवत घटनेची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर 14 डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याच्या आदेशापासून सूट देण्यात यावी, अशी मागणी केली.

“जेपी नड्डा यांच्या झेड प्लस सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पर्यायी सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. बंगाल पोलिसांनी त्यांच्यासाठी पायलट कारसह एक बुलेट प्रूफ वाहनही उपलब्ध केलं होतं. विशेष म्हणजे डिआयजी स्थरावरचे पोलीस अधिकारी बंदोबस्ताकडे लक्ष ठेवून होते. केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांसह खासगी सुरक्षा गार्ड, 4 अतिरिक्त राज्य पोलीस अधीक्षक, 8 उप पोलीस अधीक्षक, 14 निरीक्षक, 70 पोलीस अधिकारी, 40 आरएएफ जवान, 259 पोलीस कॉन्स्टेबल आणि 350 नागरिक स्वयंसेवक म्हणून तैनात करण्यात आले होते. नड्डा ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गावर सर्व व्यवस्था करण्यात आली होती”, असं त्यांनी पत्रात सांगितलं.

“जेपी नड्डा यांच्या ताफ्याचा विचार करुनच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र, अचानक ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरच्या गाड्या आल्याने गडबड झाली. याप्रकरणी पोलिसांनी उस्ती आणि पलता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तपास सुरु आहे. राज्य सरकारने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे 14 डिसेंबरच्या उपस्थितीच्या आदेशातून आम्हाला सूट देण्यात यावी”, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या : पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.