धक्कादायक! मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार, 2 जवान गंभीर जखमी

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याची माहिती समोर येत असताना आज एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाले आहेत.

धक्कादायक! मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार, 2 जवान गंभीर जखमी
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 3:28 PM

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिरीबाममध्ये उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सुरक्षारक्षक गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर काही उग्रवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे एन बीरेन सिंह उद्या जिरिबाममध्ये जाणार होते. पण त्याआधीच ही हल्ल्याची घटना घडली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांचा ताफा मणिपूरचा हिंसा प्रभावित जिरीबाम जिल्ह्याच्या दिशेला जात होता. या दरम्यान अचानक त्यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरु झाला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. कोटलेन गावानजिक बराचवेळ दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.

उग्रवाद्यांनी 50 घरे जाळली

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये अजूनही घट झालेली नाही हेच या घटनेतून समोर येत आहे. उग्रवाद्यांनी जिरीबाम परिसरात दोन पोलीस चौकी, वन विभागाचे कार्यालय आणि 50 पेक्षा जास्त घरांना आग लावली होती. उग्रवाद्यांच्या हिंसाचारानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणादेखील सर्तक झाल्या आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. उग्रवाद्यांनी लमताई खुनौ, डिबोंग खुनौ, नुनखाल आणि बेगरा गांव या परिसरात 70 पेक्षा जास्त घरांना आग लावली होती.

मणिपूरच्या जिरीबाम येथे संशयित उग्रवाद्यांमधील 59 वर्षीय व्यक्तीच्या हत्यानंतर हिंसा भडकल्याची माहिती मिळत आहे. सोइबन सरतकुमार सिंह नावाचा व्यक्ती 6 जूनला आपल्या शेतात गेल्यानंतर गायब झाला होता. नंतर या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मणिपूरमध्ये याआधीदेखील जातीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भडकलेल्या हिंसाचारात 200 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच काही समाजकंटकांडून महिला आणि मुलींसोबत अतिशय अमानवीय आणि संतापजनक कृत्य करण्यात आलं होतं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.