Video : गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तजाने आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तसेच त्याचीही नोकरीही सुटली आहे. यामुळे मानसिक तणावात आहे. यातूनच त्याने हे कृत्य केले. सुरक्षारक्षकांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होता की त्याला कोणीतरी गोळी मारा.

Video : गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
उत्तर प्रदेशात गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्लाImage Credit source: Dainik Bhaskar
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 4:41 PM

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरा (Gorakhnath Temple)त पीएसी बटालियनच्या जवानांवर एका अज्ञात तरुणाने हल्ला (Attack) केल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंदिरावरील हल्ल्याची माहिती मिळताच मंदिरात इतरत्र तैनात जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जवानांना येताना पाहून हल्लेखोराने जोरजोरात अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. अहमद मुर्तजा असे हल्लेखोराचे नाव आहे. बऱ्याच झटापटीनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले. ही बाब निदर्शनास येताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. (Attack on PAC jawans at Gorakhnath temple video goes viral on social media)

हल्लेखोराचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे स्पष्ट नाही

अहमद मुर्तजा हा गोरखपूरचा रहिवासी असून तो कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची पुष्टी झालेली नाही. पीएसी बटालियनचे जवान गोपाल गौर आणि अनिल कुमार पासवान गोरखनाथ मंदिराच्या दक्षिणेकडील गेटवर कर्तव्यावर होते. रविवारी सायंकाळी मंदिरांच्या उत्तर-पूर्व दरवाज्यातून वेगाने आत आला. त्याने मुख्य दरवाजावर तैनात असलेल्या हवालदार गोपाल यांच्या जवळ येत त्यांच्याकडील शस्त्र हिसकावून घेण्यास सुरवात केली. गोपाल यांना काही कळायच्या आतच हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली. गोपाल यांचा आवाज ऐकून दुसरा हवालदार पळत आला, त्यालाही हल्लेखोराने जखमी केले.

आरोपी उच्चशिक्षित असून इंजिनिअरिंग शिकलाय

मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तजाने आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तसेच त्याचीही नोकरीही सुटली आहे. यामुळे मानसिक तणावात आहे. यातूनच त्याने हे कृत्य केले. सुरक्षारक्षकांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होता की त्याला कोणीतरी गोळी मारा. या चकमकीत तोही जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेचा सखोल तपास पोलिस करताहेत

या घटनेमागे नेमके काय सत्य आहे ? याचा पोलिस तपास करीत आहेत. हल्लेखोराकडून धारदार शस्त्र, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप आणि विमानाचे तिकिट हस्तगत करण्यात आले आहे. या हल्ल्यात मूर्तिजाचा साथीदारही असल्याची शंका पोलिसांना आहे. यासाठी पोलिस परिसरात सर्च मोहिम राबवत आहेत. तसेच आरोपीच्या वडिलांचीही चौकशी सुरु आहे. (Attack on PAC jawans at Gorakhnath temple video goes viral on social media)

इतर बातम्या

Bhandara Crime : नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळला

Pune IPL betting : आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एकाचा शोध सुरू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.