दिल्लीत चाललंय काय? महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या घरावरच हल्ला; वाहनांची तोडफोड

साजिद खान यांनी 10 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला होता. तसेच साजिदला बिग बॉसमधून हटवण्याची मागणीही त्यांनी केली होती.

दिल्लीत चाललंय काय? महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या घरावरच हल्ला; वाहनांची तोडफोड
दिल्लीत चाललंय काय? महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या घरावरच हल्ला; वाहनांची तोडफोडImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 12:08 PM

नवी दिल्ली: नवी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा (Chairperson of Delhi Commission for Women) स्वाती मालिवाल यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना घडली. हल्ल्याच्यावेळी स्वाती मालिवाल (Swati Maliwal) आणि त्यांची आई घरात नव्हत्या. हल्लेखोराने मालिवाल यांच्या वाहनांची तोडफोड (Attack) केली आणि घरात घुसण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळत आहे. स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

स्वाती मालिवाल यांनी ट्विट करून या हल्ल्याची माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच माझ्या घरावर हल्ला झाला. हल्लेखोर घराच्या परिसरात आला आणि त्याने हल्ला केला. हल्लेखोराने माझी आणि माझ्या आईच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली.

त्याने घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने त्यावेळी आम्ही घरात नव्हतो. नाही तर काय झालं असतं सांगता येत नाही. काहीही करा. मी घाबरणार नाही. दिल्ली पोलिसांकडे तक्रार करत आहे, असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लगोलग ट्विट केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपण ढासळली आहे. एवढेच काय दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाही सुरक्षित नाहीत. उघडपणे हत्या होत आहेत. आशा आहे की नायब राज्यपाल थोडा वेळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही देतील, असा टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.

आपल्याला बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार यापूर्वीच स्वाती मालिवाल यांनी दिली होती. मी टूच्या पीडितांचं समर्थन केल्याप्रकरणी आपल्याला रेपच्या धमक्या मिळत आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. जेव्हापासून आपण चित्रपट निर्माते साजिद खान यांच्याविरोधात आवाज उठवला तेव्हापासून विविध सोशल मीडियातून आपल्याला बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.

साजिद खान यांनी 10 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला होता. तसेच साजिदला बिग बॉसमधून हटवण्याची मागणीही त्यांनी केली होती. गेल्यावर्षीच स्वाती यांच्याकडे दुसऱ्यांदा दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.