बांगलादेशातील कट्टरपंथींनी कुटुंबियांची केली हत्या, मग 17 वर्षीय हिंदू युवती रात्रभर धावत राहिली अन् भारतात पोहचली, पुढे…

Attacks on Hindus in Bangladesh: भारतात आलेल्या त्या मुलीने सांगितले, वैध पद्धतीने भारतात येण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागली असती. त्यामुळे पायीच भारतात येण्याचा निर्णय घेतला. रात्रभर चालत आणि धावत ती भारतात आली. तिने आपल्यासोबत घडलेली घटनाही पोलिसांना सांगितली.

बांगलादेशातील कट्टरपंथींनी कुटुंबियांची केली हत्या, मग 17 वर्षीय हिंदू युवती रात्रभर धावत राहिली अन् भारतात पोहचली, पुढे...
file photo
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 5:25 PM

Attacks on Hindus in Bangladesh: बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले वाढत आहेत. त्या देशातील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यात युनूस सरकार अपयशी ठरले आहे. कट्टपंथींपुढे युनूस सरकारने शरणागती पत्कारली आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे 17 वर्षीय हिंदू युवती रात्रभर धावत राहिली. त्यानंतर बांगलादेशातून ती भारतात दाखल झाली. त्याच्या परिवाराची कट्टरपंथींनी हत्या केली होती. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ती युवती इस्कॉन भक्त आहे.

यासाठी भारतात दाखल

भारतात आलेल्या त्या मुलीने सांगितले, वैध पद्धतीने भारतात येण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागली असती. त्यामुळे पायीच भारतात येण्याचा निर्णय घेतला. रात्रभर चालत आणि धावत ती भारतात आली. तिने आपल्यासोबत घडलेली घटनाही पोलिसांना सांगितली. ती १७ वर्षीय मुलगी पश्चिम बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यात अवैध पद्धतीने पोहचली. त्यानंतर तिला सीमा सुरक्षा दलाने पकडले. त्यावेळी तिने भारतात आपले नातेवाईक असल्याचा दावा केला. ती मुलगी बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यात राहत होती.

मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले…

पीटीआयने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, मुलीच्या भारतीय नातेवाईकांनी सांगितले की, ती मुलगी आणि तिचा परिवार इस्कॉन भक्त आहे. कट्टरपथींनी तिचे आणि तिच्या कुटुंबाचे अपहरण केले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांची हत्या केली. तिने कट्टरपथींच्या तावडीतून सुटका करुन घेत भारताकडे धाव घेतली. त्या मुलीचे वडील बांगलादेशात मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह होते.

हे सुद्धा वाचा

बांगलादेशात हिंदूंवर हल्ले वाढत आहे. त्यानंतर पोलिसांकडून कट्टरपथींयांवर कारवाई केली जात नाही. २५ नोव्हेंबर रोजी ढाकाचे हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इस्कॉनच्या भक्तांना टार्गेट केले जात आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या घरांवर जमाव हल्ले करत आहे. त्यांची संपत्ती लुटून नेत आहे. मंदिरांवर हल्ले केले जात आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.