अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान हल्ल्याचा प्रयत्न, आपचा भाजपवर आरोप
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आलीये. आप नेते मनीष सिसोदिया म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेला हल्ला हा निंदनीय आणि चिंताजनक आहे. भाजपने आपल्या गुंडांनी हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झालाय. पदयात्रेदरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाजपने पाठवलेल्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया म्हणाले की, ‘अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ला निंदनीय आणि चिंताजनक आहे. भाजपच्या गुंडांनी हा हल्ला केलाय. अरविंद केजरीवाल यांना जर काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी भाजपची असेल. आम्ही त्यांना घाबरत नाही. आम आदमी पार्टी आपल्या ध्येयावर ठाम आहे.’
अरविंद केजरीवाल जी पर हुआ हमला बेहद निंदनीय और चिंताजनक है। यह साफ है कि भाजपा ने अपने गुंडों से यह हमला कराया है।
अगर अरविंद केजरीवाल जी को कुछ होता है, तो उसकी पूरी ज़िम्मेदारी भाजपा पर होगी। हम डरने वाले नहीं हैं—आम आदमी पार्टी अपने मिशन पर डटी रहेगी। #AttackOnKejriwal
— Manish Sisodia (@msisodia) October 25, 2024
भाजपला केजरीवालांना मारायचे आहे- मुख्यमंत्री आतिशी
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, आज अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेत भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. भाजपने प्रथम त्यांना खोट्या प्रकरणात अटक केली. त्यानंतर त्यांना तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांना इन्सुलिन देण्यात आले नाही. कोर्टात गेल्यानंतर त्यांना इन्सुलिन मिळाले. भाजपला अरविंद केजरीवाल यांचे काम थांबवायचे आहे. भाजपला केजरीवालांना मारायचे आहे.
“जब ED, CBI और जेल से भी बात नहीं बनी, तो अब भाजपा वाले @ArvindKejriwal जी पर हमले करवा रहे हैं। अगर केजरीवाल जी को कुछ भी होता है, तो उसके लिए भाजपा सीधे तौर पर जिम्मेदार होगी। pic.twitter.com/ihyfPVBlV9
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) October 25, 2024
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, विकासपुरी पदयात्रेदरम्यान भाजपशी संबंधित लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणाले की, ईडी, सीबीआय आणि तुरुंगात जाऊनही काम झाले नाही, तेव्हा आता भाजपचे लोक अरविंद केजरीवालांवर हल्ला करत आहेत. केजरीवाल यांना काही झाले तर त्याला भाजप थेट जबाबदार असेल.
सौरभ भारद्वाज म्हणाले की, अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात असताना त्यांचे इन्सुलिन बंद करण्यात आले होते, त्यांची किडनी खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता असा भ्याड हल्ला करण्यात आला. जनतेचे प्रेम मिळत असल्याने आणि ते सातत्याने लोकांमध्ये जात असल्याने असे हल्ले केले जात आहे.