पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिलाव होणार आहे. या भेटवस्तूंची मुळ किंमत सरकारी समिती ठरवते. या भेटवस्तूंची किंमत 600 पासून ते 8.26 लाख रुपयांपर्यंत आहे. २ ऑक्टोबरपर्यंत हा लिलाव असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 12:14 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या भेटवस्तूंची मूळ किंमत सुमारे दीड कोटी रुपये असेल. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली आहे. पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचे शूज आणि इतर गोष्टींपासून ते राम मंदिराच्या प्रतिकृतीपर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश असणार आहे. गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे प्रदर्शन करणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्यांनी सांगितले की, या भेटवस्तूंचा लिलाव करण्यासाठी आधारभूत किंमत सरकारी समिती ठरवते. या वस्तूंची किंमती किमान 600 रुपये ते कमाल 8.26 लाख रुपये आहे.

लिलावात मिळालेला पैसा कुठे खर्च होणार?

ते म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव करण्याची नवी संस्कृती सुरू केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते हे करत होते. मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन त्यांना मिळणाऱ्या पैशांचा वापर गंगा स्वच्छ करण्यात गुंतवला जातो. हा सहावा लिलाव असणार आहे. यावेळीही मिळालेली रक्कम राष्ट्रीय गंगा निधीला दान केली जाणार आहे.

गेल्या वर्षभरात पंतप्रधान मोदींना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 600 वस्तूंचा लिलाव होणार आहे. सर्वात जास्त आधारभूत किंमत असलेल्या भेटवस्तूंमध्ये पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते नित्या श्रीशिवन आणि सुकांत कदम यांचे बॅडमिंटन रॅकेट आणि रौप्य पदक विजेता योगेश खातुनियाचे डिस्कस आहेत. त्यांची मूळ किंमत सुमारे 5.50 लाख आहे.

टोपीची मूळ किंमत रु. 2.86 लाख

पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेता अजित सिंग, सिमरन शर्मा आणि रौप्यपदक विजेता निषाद कुमार यांनी भेट दिलेल्या शूजव्यतिरिक्त, रौप्य पदक विजेता शरद कुमार यांनी स्वाक्षरी केलेल्या टोपीची मूळ किंमत सुमारे 2.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय राम मंदिराची प्रतिकृतीही आहे. त्याची मूळ किंमत 5.50 लाख रुपये आहे. मोराची मूर्तीही आहे. त्याची मूळ किंमत 3.30 लाख रुपये आहे.

राम दरबाराच्या मूर्तीची किंमत 2.76 लाख रुपये आहे. चांदीच्या वीणाची किंमत 1.65 लाख रुपये आहे. इतरही काही गोष्टी आहेत, ज्यांचा लिलाव होणार आहे. सर्वात कमी आधारभूत किमतीच्या भेटवस्तूंमध्ये सूती अंगवस्त्र, टोप्या आणि शाल आहेत. त्यांची किंमत 600 रुपये आहे. 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी हा लिलाव सुरू होणार आहे. जो 2 ऑक्टोबर रोजी संपेल.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.