पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेलची फाईल? काँग्रेसकडून ऑडिओ क्लिप जारी
नवी दिल्ली : राफेल विमान कराराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याच्या फाईल आहेत, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या विधानाला दुजोरा देण्यासाठी गोव्यातील विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजीत […]
नवी दिल्ली : राफेल विमान कराराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याच्या फाईल आहेत, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या विधानाला दुजोरा देण्यासाठी गोव्यातील विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप समोर आणली असून, यात विश्वजीत राणे हे स्वत: सांगत आहेत की, पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेल कराराच्या फाईल्स आहेत.
लोकसभेतही आज राफेल कराराच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असतानाच, काँग्रेसने राफेलसंदर्भात सनसनाटी ऑडिओ क्लिप जारी करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यात, वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टात राफेलच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे कुणा अज्ञात व्यक्तील उद्देशून सांगत आहेत की, “मुख्यमंत्री पर्रिकारंनी सांगितले की, कुणीच त्यांचं काही बिघडवू शकत नाही. राफेलशी संबंधित फाईल माझ्या बेडरुममध्ये आहेत.”
Hear the leaked conversation with BJP MLA, @visrane, as he reveals Goa CM @manoharparrikar has hidden details of the #RafaleScam #RafaleAudioLeak pic.twitter.com/pIWnmFQp3q
— Congress (@INCIndia) January 2, 2019
काँग्रेसचे नेमके आरोप काय?
राफेल करारासंदर्भातील सर्व फाईल्स गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या घरात आहेत, असे सांगत असताना रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले, “10 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले होते, तेव्हा मनोहर पर्रिकर गोव्यात मासे खरेदी करत होते. पंतप्रधानांच्या प्रतिनिधी मंडळात मनोहर पर्रिकर नव्हते, तर अनिल अंबानी होते.”
काँग्रेसचे तीन प्रश्न
प्रश्न क्रमांक 1 – मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचा कोणतं रहस्य दडलं आहे?
प्रश्न क्रमांक 2 – राफेलच्या फाईलमध्ये असा कोणता घोटाळा आहे, ज्यावर चौकीदार पडदा टाकू पाहत आहेत.
प्रश्न क्रमांक 3 – राफेलमध्ये घोटाळा झाल्यानेच चौकीदार जेपीसीची मागणी करत आहे?
“राफेलच्या आरोपांवर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे. राफेलशी संबंधित प्रश्नांना उत्तर देणे चौकीदार टाळत आहेत. ते म्हणतायेत की, त्यांच्यावर कोणतेच व्यक्तिगत आरोप नाहीत. मात्र, फ्रांस्वा ओलांद यांनीही व्यक्तिगत आरोप लावले आहेत की, मोदींनी अट ठेवली होती की अनिल अंबानींना राफेल कंपनीचा कंत्राट द्यावा.”, असेही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
विश्वजीत राणेंचं स्पष्टीकरण
“काँग्रेसने ऑडिओ क्लीपशी छेडछाड केली आहे. काँग्रेसने अशाप्रकारे खालच्या थराला जाणं थांबवलं पाहिजे. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री पर्रिकर यांच्यात विसंवाद निर्माण व्हावा म्हणून काँग्रेसने हे तयार केलंय. पर्रिकरांनी राफेल किंवा कोणत्याही कागदपत्रासंदर्भात विधान केले नाही. त्यामुळे चौकशी करण्याची मागणी करणार आहे.”, असे विश्वजीत राणे यांनी सांगितले.
Goa Min Vishwajit P Rane: The audio tape is doctored. Congress has stooped to such a low level to doctor a tape to create miscommunication b/w cabinet&CM. Mr Parrikar has never made any reference to Rafale or any documents. Have asked him for a criminal investigation into this. pic.twitter.com/pEA6L1SiTx
— ANI (@ANI) January 2, 2019