Monsoon Updates: यंदाचा मान्सून बळीराजाला सुखवणारा; ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज; दुष्काळही हटणार
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला तर राज्यातील बळीराजासह देशातील अनेक शेतकरी या पावसामुळे सुखावणार आहेत. मागील वर्षीही देशाबरोबरच राजयातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता. कोरोनानंतर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नवी दिल्ली: यंदाचा मान्सून हा शेतकऱ्यांसाठी सुखाचा आणि आनंदाचा असणार आहे. कारण यावर्षी मान्सून वेळेत येणार असून तो चांगला राहणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मान्सून (Monsoon) चांगली हजेरी लावणार असल्याचा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान (Australian Meteorological Department) खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची हजेरी चांगली राहणार असल्याने यंदा दुष्काळाचे (Drought) सावट नसणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खाते हे त्यांच्या अचूक अंदाजासाठी जगात ओळखले जाते. यंदा मान्सूनने जर शेतकऱ्यांना चांगली साथ दिली तर गेल्या अडीच ते तीन वर्षात शेतीचे झालेले नुकसाना काही अंशी भरून निघेल अशी अशाही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मान्सून फायद्याचा असणार आहे.
आपल्या अचूक अंदाजासाठी जगविख्यात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने मान्सूनबाबतची आनंदाचे वृत्त दिले असल्याने यंदाच्या पावसामुळे विविध भागातील शेतकरी या पावसामुळे सुखवणार आहेत.
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याकडून मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी भारतातील हवामान खात्याकडून अजूनपर्यंत असा कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या नंतर आता एप्रिलमधील पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा अंदाज वर्तवला जाण्याची शक्यता आहे.
बळीराजा सुखावणार
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला तर राज्यातील बळीराजासह देशातील अनेक शेतकरी या पावसामुळे सुखावणार आहेत. मागील वर्षीही देशाबरोबरच राजयातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता. कोरोनानंतर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. यंदा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे पाऊस झाला तर शेतकरी सुखावणार आहे.
संबंधित बातम्या
म्हशीशी सामना करणं सिंहाला पडलं भारी! जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, Video viral