जून महिन्याच्या सुरुवातीला चांगली बातमी, निवडणूक निकालानंतर हवाईसफर स्वस्त होणार
atf fuel price: आंतरराष्ट्रीय मार्गांसाठीही जेट इंधनाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशातील चारही महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधन प्रति किलोलिटर 51.1 डॉलरने स्वस्त झाले आहे. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत किंमत 870.73 डॉलर प्रति किलोलीटरवर आली आहे.
1 जून सुरु होताच मान्सूनचे वेध लागते. मान्सूनने यंदा चांगली बातमी दिली आहे. आता आईल कंपन्यांकडूनही चांगली बातमी मिळाली आहे. हवाई सफर करणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे. हवाई सफर लवकरच स्वस्त होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर विमान भाड्यात कपात होणार आहे. 1 जून रोजी ऑईल कंपन्यांनी जेट फ्यूल म्हणजेच एअर टर्बाइन फ्यूल (एटीएफ) च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. जेट फ्यूल स्वस्त झाल्यामुळे विमान भाडे कमी होणार आहे.
विमानांमध्ये इंधन म्हणून जेट फ्यूल वापरले जाते. हे इंधन दिल्लीत डॉमेस्टिक रूट्ससाठी एका लाखाच्या खाली आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानांसाठी फ्यूलच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. यामुळे विमान कंपन्यांचा खर्च कमी होणार आहे. त्याचा परिणाम विमान कंपन्या भाडे कमी करणार आहे.
डॉमेस्टिक रूट्ससाठी किती स्वस्त झाले फ्यूल?
डॉमेस्टिक रूट्ससाठी इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. नवी दिल्लीत या इंधनाची किंमत एक लाख किलोलीटरपेक्षा कमी झाली आहे. 1 जून रोजी दिल्लीत एटीएफचे दर 6,673.87 रुपये कमी करण्यात आले. त्यामुळे हे दर आता 94,969.01 रुपयांवर आले आहे. कोलकातामध्ये एटीएफचे दर दिल्लीपेक्षाही जास्त कमी झाले आहे. 6,868.13 रुपये कमी झाल्यामुळे कोलकातामधील दर 1,03,715 आले आहे.
एटीएफचे सर्वात कमी दर मुंबईत
देशात एटीएफचे सर्वात कमी दर मुंबईत आहे. 1 जून रोजी पुन्हा या दरात 6,339.43 रुपयांनी कपता केली आहे. यामुळे दर 6,339.43 रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे हे दर आता 88,834.27 रुपयांवर आले आहे. चेन्नईमध्ये एटीएफचे दर सर्वाधिक 7,044.95 रुपये दर कमी झाले आहे. यामुळे चेन्नईत विमानाचे इंधन 98,557.14 रुपयांवर आले आहे. आता दिल्ली, मुंबई, चेन्नई ही तीन महानगर वगळल्यास केवळ कोलकातामध्ये एटीएफचे दर एका लाखाच्या वर आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डान स्वस्त होणार
आंतरराष्ट्रीय मार्गांसाठीही जेट इंधनाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशातील चारही महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधन प्रति किलोलिटर 51.1 डॉलरने स्वस्त झाले आहे. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत किंमत 870.73 डॉलर प्रति किलोलीटरवर आली आहे. याशिवाय, कोलकातामध्ये किंमती 909.66 डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. देशातील हे एकमेव महानगर आहे ज्या ठिकाणी किंमत अजूनही प्रति किलोलिटर 900 डॉलरच्या वर आहेत.