सुप्रीम कोर्टात राम मंदिरास विरोध केला, आता बाबरीचे पक्षकार राम मंदिर सोहळ्यास जाणार का ?

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. हा सोहळा 16 जानेवारीपासून सुरु होऊन सात दिवस राहणार आहे. या सोहळ्या कधीकाळी बाबरी मशीदचे पक्षकार असलेले इक्बाल अंसारी जाणार का?

सुप्रीम कोर्टात राम मंदिरास विरोध केला, आता बाबरीचे पक्षकार राम मंदिर सोहळ्यास जाणार का ?
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 12:52 PM

प्रदीप कापसे, अयोध्या, दि. 1 जानेवारी 2024 | अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. त्यावेळी इक्बाल अंसारी यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण बाबरी मशीदकडून ते पक्षकार होते. 2016 मध्ये 95 वर्षीय हाशिम अंसारी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा असलेल्या इक्बाल यांनी न्यायालयात हे प्रकरण चालवले. आता इक्बाल अंसारी यांची भूमिका बदलली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्यात आले होते. त्यावेळी त्यांनी रोड शो केला. या रोडशोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फुलांचा वर्षाव अंसारी यांनी केला. राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. त्या कार्यक्रमास ते गेले होते. आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यास आपण जाणार आहोत, असे इक्बाल अंसारी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

काय म्हणाले अंसारी

राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले तर आपण जाणार आहोत. अयोध्येत आता हिंदू मुस्लिम वाद राहिला नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे, यासाठी अयोध्येचा नागरिक म्हणून मलाही अभिमान आहे. अयोध्येत आता कधीच हिंदू, मुस्लिम दंगे होणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला अन् अयोध्येत मंदिर उभे राहिले. आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असे बाबरीचे पक्षकार इक्बाल अंसारी यांनी “टीव्ही ९ मराठी”ला प्रतिक्रिया देताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

अयोध्याचा चौफेर विकास, मोदींचे कौतूक

इक्बाल अंसारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचा विकास चांगला झाला आहे. अयोध्येत लहान रेल्वे स्टेशन होते. आता तीन मजली भव्य स्टेशन झाले आहे. अयोध्येत विमानतळ नव्हते. आता विमानतळ उभारले गेले आहे. अयोध्येत सर्व बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा माझ्या घरासमोरुन गेला तेव्हा मी फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत केले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.