अयोध्येत होत असलेली मशिद कशी आहे ? वाचनालय, रूग्णालय आणि बरंच काही, स्पेशल रिपोर्ट
अयोध्येतील धनीपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचा आराखडा जवळपास निश्चित करण्यात आला आहे (Ayodhya dhannipur masjid design launched).
लखनऊ : अयोध्येतील धनीपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचा आराखडा जवळपास निश्चित करण्यात आला आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने (आयआयसीएफ) शनिवारी (19 डिसेंबर) मिशिदीचं डिझाईन आणि आर्किटेक्ट प्रसिद्ध केले. फाउंडेशनकडून जारी करण्यात आलेल्या रचनेनुसार मशिदीला घुमट असणार नाही. मशिदीव्यतिरिक्त परिसरात संग्रहालये, रुग्णालये, ग्रंथालये आणि कम्युनिटी किचनही उभारण्यात येणार आहेत. चित्रातील गोल इमारत मशिदीची असून उर्वरित सुविधांसाठी चौकोनी इमारत असणार आहे (Ayodhya dhannipur masjid design launched).
धनीपूर मशिद पुढच्या दोन वर्षात उभारण्याचं लक्ष्य आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन नकाशा पास झाल्यानंतर आणि स्वयंचाचणीनंतर मशिदीच्या बांधकामाची तारीख ठरवणार आहे. ट्रस्ट 26 जानेवारीपासून बांधकामाचं काम सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र सध्या ते कठीण दिसत आहे. येत्या 26 जानेवारी पासून सर्व शक्य नाही झालं तर पुढच्या 15 ऑगस्टपासून तरी मशिदच्या बांधकामास सुरुवात होऊ शकते.
विशेष म्हणजे ज्यादिवशी मशिदीचं काम सुरु होईल त्यादिवशी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही. मशिदीत एकाच वेळी दोन हजार लोकांना एकत्र नमाज पठण करता येईल, अशी सुविधा करण्यात येईल. दरम्यान, या मशिदीसाठी नेमका किती खर्च हे सध्या तरी सांगता येणार नाही.
मशिदीत सोलार पावर सिस्टिम बसवण्यात येईल. त्याचबरोबर 200 ते 300 बेड्सचं रुग्णालय उभारण्यात येईल. मशिदीच्या बांधकामासाठी चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात येईल. दरम्यान, मशिदीच्या बांधकाम ज्यादिवशी सुरु होईल, त्यादिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलवणार का? असा प्रश्न ट्रस्टला विचारण्यात आला. या प्रश्नावर ट्रस्टने त्यात काही अर्थ नसल्याचं सांगितलं.
राम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डला मशिद बांधण्यासाठी पाच एकर जमीन देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येपासून 30 किमी अंतरावर लखनऊ-गोरखपूर हायवेवर धन्नीपूर गावात मशिदीसाठी 5 एकर जागा दिली आहे. या गावात जळपास 60 टक्के नागरिक मुस्लिम समाजाचे आहेत. इतर 40 टक्के नागरिक यादव समाजाचे आहेत (Ayodhya dhannipur masjid design launched).
हेही वाचा : लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नको, ‘या’ कारणांमुळे आदर पुनावाला यांची सरकारकडे मागणी