Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातच ‘तो’ खाली कोसळला, अचानक हार्ट ॲटॅक, एवढ्या गर्दीत कोणी वाचवलं ?

22 जानेवारीला (सोमवार) अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. याच सोहळ्यादरम्यान मंदिराच्या परिसरात एक व्यक्ती अचानक खाली कोसळली. त्याला हार्ट ॲटॅक आला. एकच गदारोळ माजला..

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातच 'तो' खाली कोसळला, अचानक हार्ट ॲटॅक, एवढ्या गर्दीत कोणी वाचवलं ?
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 10:37 AM

अयोध्या | 23 जानेवारी 2024 : 22 जानेवारीला (सोमवार) अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील अनेक मान्यवर, उद्योगपती, राजकारणी, बॉलिवूडमधील कलाकारांसह हजारो नागरिक उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या सुरेख मूर्तीचे सर्वांनी मनोभावे दर्शनही घेतले. या सोहळ्याची चर्चा आता कित्येक महीने सुरूच राहील. मात्र याच सोहळ्यादरम्यान मंदिराच्या परिसरात एक व्यक्ती अचानक खाली कोसळली. त्याला हार्ट ॲटॅक आला. एकच गदारोळ माजला, काय कराव कोणालाही सुचक नव्हतं.

मात्र भारतीय वायु सेनेच्या (IAF) रॅपिड रिस्पॉन्स टीमने लागलीच धाव घेत खाली पडलेल्या त्या व्यक्तीला उचललं आणि भर गर्दीतून आधी बाहेर काढलं. मेडिकल इमर्जन्सीसाठी तैनात करण्यात आलेल्या मोबाईल हॉस्पिटलमध्ये त्या माणसाला दाखल करून तातडीने त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्या इसमाला हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट ॲटॅक आला होता. मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने त्याला जीवनदान मिळालं आणि त्याची प्रकृती स्थिर झाली. अचानक घडलेल्या या घटनेने अनेक जण बावचळले, पण भारतीय वायु सेनेच्या जवानांच्या तत्परतेमुळे आणि डॉक्टरांच्या उपचारांमुळे काही अघटित घडलं नाही.

प्राण प्रतिष्ठा होतानाच आला हार्ट ॲटॅक

वास्तविक, 65 वर्षांचे रामकृष्ण श्रीवास्तव अभिषेक हे 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होण्यासाठी अयोध्येत आले होते. कार्यक्रमादरम्यान ते अचानक मंदिराच्या आवारात कोसळले. रामकृष्ण श्रीवास्तव पडताच भारतीय हवाई दलाच्या (IAF) रॅपिड रिस्पॉन्स टीमने त्यांना कार्यक्रमातून तात्काळ बाहेर काढले. त्याचे नेतृत्व विंग कमांडर मनीष गुप्ता यांनी केले. रामकृष्ण श्रीवास्तव पडल्यानंतर अवघ्या एका मिनिटात त्यांना जवळच असलेल्या मोबाईल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रिपोर्टनुसार, रामकृष्ण श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची प्रकृती बरीच बिघडली होती. प्राथमिक तपासणीत त्यांचा रक्तदाबही खूप वाढला होता.

नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवलं

त्यानंतर रामकृष्ण श्रीवास्तव यांच्यावर त्या (मोबाईल) रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर होण्याची वाट डॉक्टरांनी पाहिली. एकदा ते स्थिर झाल्यावर रामकृष्ण श्रीवास्तव यांना पुढील वैद्यकीय निरीक्षण आणि विशेष काळजी घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मंदिर परिसरात अनेक वैद्यकीय सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी वैद्यकीय तयारीची माहिती दिली होती. आरोग्य मैत्री आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत दोन क्यूब-BHISHM मोबाइल हॉस्पिटल्स (फिरती रुग्णालये) तैनात करण्यात आली होती, त्यामुळेच एक व्यक्तीचा जीव वाचला.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.