Ayodhya Ram Mandir | अयोध्या राम मंदिरात दर्शनासंदर्भात महत्त्वाची Update, वेळेत काय बदल?
Ayodhya Ram Mandir | अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. हीच वाढणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनाच्या वेळेसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आजही मंदिर परिसरात रामभक्तांची जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांग आहे. लोक तासनतास रांगेत थांबून आपल्या आराध्याच दर्शन घेत आहे.
Ayodhya Ram Mandir | अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे. मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुल झाल्यानंतर मागच्या दोन दिवसात प्रचंड गर्दी झाली आहे. देशभरातून लोक प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ होती. आता रामभक्त रात्री 10 वाजेपर्यंत रामललाचे दर्शन घेऊ शकतात. सकाळच्या पाळीत सकाळी 7 ते 11.30 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. अयोध्येत दुसऱ्यादिवशी सुद्धा रामभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे मंगळवारी जवळपास 5 लाख भाविकांनी रामललाच दर्शन घेतलं.
प्रशासनाकडून सतत गर्दीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. रामभक्त रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत. रामललाच्या दर्शनासाठी पोलिसांनी आज बुधवारी तीन रांगा बनवल्या आहेत. त्या माध्यमातून लोकांना दर्शनासाठी मंदिरात पाठवल जात आहे. पोलीस सकाळापासूनच रांगेच व्यवस्थापन करत आहेत. भक्तांची जवळपास 1 किलोमीटरपर्यंत लांब रांग आहे. मंगळवारच्या तुलनेत आज राम मंदिर परिसरात चांगली व्यवस्था आहे. वृद्ध आणि दिव्यांगाना आता दर्शनासाठी येऊ नका, असं सांगण्यात आलं आहे.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: On the second day after the Pran Pratishtha, devotees gather in huge numbers at Rampath to have darshan of Shri Ram Lalla pic.twitter.com/JMI3AvYPca
— ANI (@ANI) January 24, 2024
आयजी रेंज अयोध्या यांनी काय सांगितलं?
“अयोध्येत सतत गर्दी असून त्यासाठी व्यवस्था केली जात आहे. आमच वृद्ध आणि दिव्यांगाना आवाहन आहे की, त्यांनी दोन आठवड्यानंतर कार्यक्रम बनवावा” असं आयजी रेंज अयोध्या प्रवीण कुमार यांनी सांगितलं. आरएएफचे डिप्युटी कमांडेंट अरुण कुमार तिवारी यांनी सांगितलं की, “मंगळवारी लोकांना जो त्रास झाला, त्यात आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय” त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही जवळपास 1000 सुरक्षारक्षकांना तैनात केलय’ उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, “लोक इथे मोठ्या संख्येने एकत्र जमलेत. प्रमुख गृह सचिव आणि मला इथे पाठवण्यात आलय. आम्ही गर्दी नियंत्रणासाठी क्यू सिस्टिम बनवली आहे”