Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात 2 दिवसात भरभरुन दान, इतक्या कोटींची देणगी जमा

Ram mandir : 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता राम मंदिर हे सर्वांसाठी खुले झाले आहे. दररोज येथे रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. पहिल्याच दिवशी जवळपास ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले. इतकंच नाही तर भक्तांनी राम मंदिरात भरभरुन दान दिले आहे.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात 2 दिवसात भरभरुन दान, इतक्या कोटींची देणगी जमा
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 7:40 PM

Ram Mandir Donation : राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर आता लाखोंच्या संख्येने लोकं अयोध्येला जात आहेत. पहिल्याच दिवशी 5 लाख लोकांनी राम मंदिरात दर्शन घेतले. राम मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत लाखो रुपयांचे दान जमा झाले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, 22 जानेवारी रोजी काउंटरवर सुमारे 6 लाख रुपयांची रोकड देणगी म्हणून देण्यात आली. ड्राफ्ट आणि चेकद्वारे एकूण 3 कोटी रुपयांचे दान मिळाले. 23 जानेवारी रोजी राम मंदिर ट्रस्टकडे 27 लाख रुपये रोख आले, तर 24 जानेवारी रोजी कॅश काउंटरवर 16 लाख रुपये दान म्हणून प्राप्त झाले.

देणग्या स्टेट बँकेकडे जमा होतात

राम मंदिरात दिलेल्या देणग्या काउंटरवर जमा केल्या जातात आणि त्याच्या पावत्या ही लगेच दिल्या जातात. दानपेटीशिवाय एक पैसाही घेतला जात नाही किंवा कोणाला दान करण्यास सांगितले जात नाही. अशी माहिती प्रकाश गुप्ता यांनी दिली. दान केलेले पैसे स्टेट बँकेच्या ताब्यात दिले जातात. बँकेचेच लोकं दानपेटी घेऊन जातात. त्यांची मोजणी अत्यंत सुरक्षित ठिकाणी केली जाते.  केवळ स्टेट बँकेचे कर्मचारीच हे पैसे काढतात.  स्टेट बँकेचे कर्मचारी आणि संस्थेचे लोकं येथे मॉनिटरिंग करतात.

राम मंदिर ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी यांनी सांगितले की प्रत्येक पैशाचा हिशेब आहे. जुन्या मंदिरातील दानपेटीतील पैशांबाबत ते म्हणाले की, पैसे काढून ठेवले आहेत. त्याची मोजणी झालेली नाही. मध्यंतरी सुट्ट्या असल्याने बँक कर्मचाऱ्यांना काम करता आले नाही.

भंडाऱ्यासाठीही भरभरुन दान

राम मंदिरात मोठ्या प्रमाणात धान्य पोहोचल्याचेही बोलले जात आहे. याबाबत ते म्हणाले की, येथे भंडारा सुरू आहे. भंडारे ट्रस्ट जो चालवत आहे तो यापुढेही चालवणार आहे. ते म्हणाले की, तांदूळ छत्तीसगडमधून आला आहे, तसा चहाची पाने आसाममधून आली. लोक इतकं देत आहेत की आम्हाला आमचा भंडारा चालवताना कोणतीही अडचण येत नाही. तसेच बाहेरून काहीही खरेदी करण्याची गरज नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.