Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात दररोज किती लोकं घेऊ शकतील दर्शन
अयोध्येतील राम मंदिराचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. २२ जानेवारी रोजी याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर २५ जानेवारीपासून सगळ्यांना येथे दर्शन घेता येणार आहे. यासाठी येथे जय्यत तयारी सुरु असून लोकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. २२ जानेवारी रोजी येथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देश-विदेशातील नद्यांच्या पाण्याने अभिषेक देखील केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांन निमंत्रण देण्यात आले आहे. २५ जानेवारीनंतर मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. या दरम्यान येथे हजारो लोकं दर्शनासाठी येणार असल्याची शक्यता आहे. लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अयोध्येतील राम मंदिर खुले झाल्यानंतर एका दिवसात सुमारे 75 हजार लोक दर्शन घेऊ शकणार आहेत.
राम मंदिर तयार होण्याची वाट रामभक्त पाहत आहेत. २२ जानेवारी रोजी देशभरात उत्साह असेल. आतापासूनच याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. भारतात अनेक मंदिरे आहेत जेथे मोठी गर्दी होते. येथे लाखो लोकं येतात. दर्शन घेतात. देशातील ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत आणि दरवर्षी लाखो लोक येथे भेट देण्यासाठी आणि नवस पूर्ण करण्यासाठी येतात.
तिरुपती बालाजी
तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर आहे. हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत आहे. येथे दररोज हजारो लोकं दर्शनासाठी येतात.धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री व्यंकटेश्वर त्यांची पत्नी पद्मावतीसोबत येथे राहतात.
वैष्णो देवी
माता वैष्णव देवी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मंदिराला दरवर्षी सुमारे 500 कोटींची देणगी येते. 14 किलोमीटर चढून गेल्यावर लोकांना मातेचे दर्शन घेता येते. येथे दररोज हजारो लोक येतात.
जगन्नाथ पुरी
ओडिशातील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर हे हिंदूंच्या चार धामांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्णाला समर्पित आहे. केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनही लोक येथे भेट देण्यासाठी येतात.
काशी विश्वनाथ
वाराणसी येथे स्थित भगवान विश्वनाथाचे मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरामुळे, वाराणसी किंवा बनारसला देशातील तसेच जगातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये एक प्रमुख स्थान आहे. येथेही हजारो लोक दर्शनासाठी येतात.