Ram Mandir Ayodhya | ‘सगळं काही रामाच्या नावावर, साक्ष दिली पण निमंत्रण नाही…’, अयोध्येतील ‘या’ कुटुंबाच दु:ख
Ram Mandir Ayodhya | सध्या देशात राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेची चर्चा आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होईल. संपूर्ण देशासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण असेल. सध्या मंदिर निर्माणाचा काम एक महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. या सगळ्यामध्ये अयोध्येतील एका कुटुंबाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच राम मंदिराशी खान कनेक्शन आहे.
Ram Mandir Ayodhya | अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरु आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होईल. या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याआधी अयोध्येतील एका कुटुंबाच दु:ख दिसून आलय. सीताराम यादव यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 1950 सालापासून मी वडिलांसोबत श्री रामललासाठी प्रसाद बनवतोय. दरदिवशी दुकानातून रबडी-पेढा श्रीराम यांना भोग चढवण्यासाठी जातो. वडिल श्री रामजन्मभूमी प्रकरणात साक्षीदार होते. पण आज त्रास होतोय, कारण प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच निमंत्रण मिळालेलं नाही. निमंत्रण मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी हरकत नाही. आम्ही श्री रामाची सेवा करत राहू, असं त्यांनी सांगितलं.
सीताराम यादव यांच अयोध्येत रबडी-पेढ्याच छोटस दुकान आहे. ते स्वत: आणि त्यांचे वडिल राम मंदिरात भोग चढवण्यासाठी बताशे बनवायचे. त्यावेळी राम मंदिर परिसरात त्यांच एकमेव दुकान होतं. त्यांच्या दुकानातून श्रीरामासाठी भोग जायचे, आताही जातात. बाबरी विध्वंसाच्यावेळी त्यांच दुकानही उद्धवस्त झालं. पण त्याची नुकसान भरपाई त्यांनी कधीही घेतली नाही. आज तकने हे वृत्त दिलय.
रामलला तंबूत होते, तेव्हापासून ही परंपरा
75 वर्षाचे सीताराम यादव आजही श्री राम ललाच्या मंदिराजवळ आपल छोटस दुकान चालवतात. त्यांच्या दुकानातून आजही श्री रामललाच्या भोगासाठी 5 किलो रबडी आणि पेढे जातात. रामलला तंबूत होते, तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे. सीताराम यादव यांच वय झाल्यामुळे आता त्यांची मुलगी श्यामा यादव त्यांना सहकार्य करते. रामललाना भोग चढवण्यासाठी दुकानावर बताशे बनवायचो. वडिलांचा 20 वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर ते स्वत: प्रसाद बनवू लागले. इतकच नाही, त्यांनी श्री राम जन्म भूमी केसमध्ये साक्षीदार म्हणून साक्ष दिली. श्रीराम तंबूत होते, त्यानंतर आता भव्य मंदिर होतय, त्यांच्याच हाताने बनवलेला भोग चढवला जातोय.
डोळ्यासमोर मंदिरात टाळ उघडण्यात आलं
वादामध्ये त्यांचं दुकान गेलं. त्यांच्या डोळ्यासमोर मंदिरात टाळ उघडण्यात आलं आणि रामाला बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान त्यांच दुकान आणि जमीन गेली. सरकारला त्यांना नुकसान भरपाई द्यायची होती, पण त्यांनी घेतली नाही. सगळ काही श्री रामाच्या नावावर केलं. काही अंतरावर त्यांच दुसर दुकान आहे. आज तिथून 5 किलो रबडी आणि पेढे भोग चढवण्यासाठी जातात. पण प्राण प्रतिष्ठापनेच त्यांना निमंत्रण मिळालेलं नाही.