Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीचा रंग का आहे काळा, जाणून घ्या कारण

Ram mandir update : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली असून सध्या त्याचे डोळे झाकण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर डोळे उघडले जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. त्याआधी मंदिरातील मूर्तीचे फोटो समोर आले असून ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे.

Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीचा रंग का आहे काळा, जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 7:48 PM

Ram mandir : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली असून २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. 22 जानेवारीला काही सेंकदाचा हा मुहूर्त असणार आहे. राम मंदिरात शुक्रवारीच रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली. त्यानंतर मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मूर्तीचा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की, मूर्तीचा रंग काळा का आहे.

राम मंदिरात विराजमान रामाची मूर्ती ही काळ्या दगडापासून बनवण्यात आली असून ती बालस्वरूपात आहे. रामललाची मूर्ती एकाच दगडापासून बनवण्यात आली आहे. या काळ्या दगडाला कृष्ण शिला असेही म्हणतात. त्यामुळे रामललाची मूर्तीही गडद काळ्या रंगाची आहे. ज्या दगडातून रामललाची मूर्ती बनवली गेली आहे त्यात अनेक गुण आहेत. तो दगड अनेक अर्थांनी विशेष आहे.

रामललाच्या मूर्तीत खास दगड का वापरले जातात?

रामललाच्या मूर्तीच्या बांधकामात हा दगड वापरण्यामागील एक कारण म्हणजे रामलल्लावर दुधाचा अभिषेक केला जातो तेव्हा दगडामुळे दुधाच्या गुणवत्तेत कोणताही बदल होणार नाही. त्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच हजार वर्षांहून अधिक काळ मूर्ती तशीच राहू शकते. म्हणजे त्यात कोणताही बदल होणार नाही.

वाल्मिकी रामायणातही वर्णन

वाल्मिकी रामायणात भगवान रामाचे रूप काळ्या रंगात वर्णन केले आहे. त्यामुळे रामललाच्या मूर्तीचा रंग काळा असण्याचे हे देखील एक कारण आहे. तसेच रामललाची पूजा श्यामल रूपातच केली जाते.

श्रीरामाची मूर्ती कशी आहे?

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, भगवान श्री रामलला यांची मूर्ती पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात आहे. त्यांनी सांगितले की, मूर्ती 51 इंच उंच असून रामललाची मूर्ती काळ्या दगडाची आहे. रामलल्लाच्या मूर्तीवर अवतार देखील दाखवण्यात आले आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. जगभरातील मंदिरांमध्ये रोषणाई केली जाणार आहे. अनेक ठिकाही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.