Ayodhya राम मंदिरात आतापर्यंत भरभरुन दान, पाहा देणगीच्या पैशांवर कोणाचं आहे नियंत्रण?

Ram mandir : अयोध्येतील राम मंदिरात आतापर्यंत २५ लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. भाविक भक्तीभावाने मोठे दान देखील करत आहेत. २२ जानेवारीला रामल्ला विराजमान झाल्यानंतर आतापर्यंत लाखो लोकांनी मंदिराला देणगी दिली आहे. पण या देणगीवर सध्या कोणाचे नियंत्रण आहे जाणून घ्या.

Ayodhya राम मंदिरात आतापर्यंत भरभरुन दान, पाहा देणगीच्या पैशांवर कोणाचं आहे नियंत्रण?
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 4:31 PM

Ayodhya Ram mandir Donation : 22 जानेवारीला भव्य अशा राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सगळ्यांसाठी खुले झाले आहे. यावेळी मंदिरात लाखो लोकं दर्शनासाठी येत आहेत. गेल्या 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी राम मंदिराला भेट दिल्याची माहिती पुढे आली आहे. या दरम्यान एकूण 11 कोटी रुपयांची देणगी राममंदिराला आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 11 दिवसांत सुमारे 8 कोटी रुपये दानपेटीत जमा करण्यात आले, तर चेक आणि ऑनलाइनद्वारे मिळालेली रक्कम सुमारे 3.5 कोटी रुपये आहे.

मंदिरात चार मोठ्या दानपेटी

प्रकाश गुप्ता यांनी माहिती दिली की, मंदिराच्या गर्भगृहात तसेच गर्भगृहासमोरील ‘दर्शन मार्गा’जवळ एकूण चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये भाविक देणगी देत आहेत. याशिवाय लोक काउंटरवरही देणगी देत आहेत. या काउंटरवर मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काउंटर बंद झाल्यानंतर ते ट्रस्टच्या कार्यालयात देणगीचा संपूर्ण हिशोब देतात. जमा झालेली सर्व देणगी मंदिर ट्रस्ट आणि एसबीआयच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली बँकेत जमा केले जातात.

कोणच्या देखरेखेखाली होते मोजणी

देणगीचा हिशोब ठेवण्यासाठी एकूण 14 लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये 11 बँक कर्मचारी आणि तीन मंदिर ट्रस्टचे सदस्य आहेत. प्रकाश गुप्ता म्हणाले की, देणगीची रक्कम जमा करण्यापासून ते मोजण्यापर्यंत सर्व गोष्टी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होत आहे.

राम मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावून दर्शन घेत आहेत. या दरम्यान ते रामलल्लाला मोठी देणगी देखील देत आहेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी देशातूनच नाही तर परदेशातून ही लोकं येत आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान ही तैनात आहेत.

मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक थंडी असताना देखील मोठ्या रांगा लावून दर्शन घेत आहेत. भाविकांची गर्दी पाहता दर्शनाचा वेळ ही वाढवण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.