अद्भुत अन् अलौकिक श्रीराम दर्शन… अयोध्येत सूर्य किरणांनी रामलल्लाचा टिळा, व्हिडिओ…
अयोध्येतील राम मंदिरात कार्यक्रमांना सुरुवात झाली. रामलल्लाला सूर्य टिळा लावण्याच्या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही लोक राम मंदिरात पोहोचले आणि त्याचे साक्षीदार झाले.

देशभरात रामनवमीचा उत्सव उत्साहात सुरु आहे. देशभरातील राम मंदिरांमध्ये रामभक्तांचा सागर लोटला आहे. ठिकाठिकाणी राम नवमीचे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु अयोध्येत राम मंदिरात देशभरातील भाविक आले आहेत. रामलल्लाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांची पारणे रामनवमीच्या दिवशी रविवारी फिटली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा टीळा सूर्यकिरणांनी लावण्यात आला. त्यावेळी रामलल्लाचे दर्शन हजारो भाविकांनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो भक्तांनी घेतले. चार लेन्स आणि चार मिररच्या मदतीने सूर्य किरण रामलल्लाच्या कापळीपर्यंत आले. त्यावेळी वैदिक मंत्रोच्चारामुळे मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. भक्तांनी भगवान राम आणि माता जानकी यांचा जयजयकार केला.
सरयूच्या घाटांवर दीपोत्सव
रविवारी पहाटेपासून अयोध्येतील राम मंदिरात कार्यक्रमांना सुरुवात झाली. रामलल्लाला सूर्य टिळा लावण्याच्या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही लोक राम मंदिरात पोहोचले आणि त्याचे साक्षीदार झाले. राम मंदिरात येणाऱ्या भाविकांवर ड्रोनचा वापर करून सरयू पाण्याचा वर्षाव करण्यात आला. अयोध्येत सर्वत्र रामाचा जयघोष होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक राम मंदिरात पोहोचले आहे. सायंकाळी उशिरा अयोध्येतील सरयूच्या घाटांवरही दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या ठिकाणी दीड लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.




भगवान रामलला का अद्भुत सूर्य तिलक, सूर्य की किरणों से सुशोभित हुआ रामलला का मस्तक #Ayodhya #Ramlala #SuryaTilak #RamNavami2025 pic.twitter.com/n1IFTM3i40
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) April 6, 2025
अयोध्येत कठोर सुरक्षा व्यवस्था
अयोध्येत सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, अयोध्येला वेगवेगळ्या झोन आणि सेक्टरमध्ये वाटण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी जड वाहनांना अयोध्येत प्रवेश बंद केला आहे. ही सर्व वाहने पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरुन जात आहे. महाकुंभाप्रमाणे पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी राम मंदिर आणि हनुमानगढीसह प्रमुख ठिकाणी सावली आणि मॅटची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रमुख ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 14 ठिकाणी तात्पुरती प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली आहेत.
नरेंद्र मोदी यांची ट्विट…
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, दैवी योगायोगा आहे. ज्या वेळी मी राम सेतूचे दर्शन घेत होतो. त्याच वेळी मला अयोध्येत रामलल्लाच्या सूर्य टिळाचे दर्शन मिळाले. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना.