Ayodhya Ram Temple | अयोध्येमध्ये प्रवेशासाठी परमिट हवं का? राम मंदिरात प्रवेशासाठी काय कराव लागणार?

Ayodhya Ram Temple | प्राण प्रतिष्ठा सोहळ्याआधी अयोध्येत सुरक्षेसाठी हायटेक व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची रेड आणि यलो झोनमध्ये विभागणी करण्यात आलीय. अयोध्येमध्ये प्रवेशासाठी काय कराव लागणार? राम मंदिरात प्रवेशासाठी काय सिस्टिम असेल? समजून घ्या.

Ayodhya Ram Temple | अयोध्येमध्ये प्रवेशासाठी परमिट हवं का? राम मंदिरात प्रवेशासाठी काय कराव लागणार?
Ayodhya ram mandir
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 1:28 PM

Ayodhya Ram Temple | आगामी 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशातील अनेक भागात या दिवसाबद्दल उत्सवासारख वातावरण आहे. राम मंदिर उद्घाटनाच साक्षीदार होण्यासाठी असंख्य भाविक अयोध्येला येण्याची योजना बनवत आहेत. अनेकांनी आधीच ठरवलय, अयोध्येला जायच. सध्या अयोध्येमध्ये सुरक्षेच एक मोठ आव्हान आहे. कुठलीही अप्रिय घटना होऊ नये, म्हणून प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने इतकी हायटेक व्यवस्था केलीय की, कोणीही सहज येऊ शकणार नाही.

प्राण प्रतिष्ठेआधी अयोध्येत चौतरफा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची रेड आणि यलो झोनमध्ये विभागणी करण्यात आलीय. यलो झोनमध्ये फक्त यूपी पोलिसांची तैनाती असेल. राम मंदिर परिसरातील काही भाग रेड झोनमध्ये असेल. 14 जानेवारीनंतर रिव्यू होईल. त्यानुसार तैनाती सुरु होईल.

प्रवेशासाठी परमिट हवं का?

अयोध्येत प्रशासनाने अशी व्यवस्था केलीय की, विना परमिट बाहेरची कुठलीही गाडी अयोध्या नगरीत प्रवेश करु शकणार नाही. जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यूपी पोलिसांचे जवान तैनात आहेत. परमिट सोबतच प्रवेश करणाऱ्या गाड्यांची रजिस्टरवर विस्तृत नोंद केली जात आहे.

कुठल्या वस्तू राम मंदिर परिसरात नेण्यास बंदी असेल?

राम मंदिर परिसरात सुरक्षा चेकिंगसाठी स्कॅनिंग आणि फ़्रीस्किंग केबिनच इंस्टॉलेशन केलं जातय. मंदिरात प्रवेश करण्याआधी भाविकांना एअरपोर्टवरील चेक इन सारख्या सुरक्षा चेकिंगमधून जाव लागेल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिराच्या आत कोणतही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, लेदर प्रोडक्ट, बेल्ट तसच मेटल प्रोडक्ट आतमध्ये घेऊन जायला प्रतिबंध असेल.

तीन लेयरची सुरक्षा व्यवस्था

मंदिरात प्रवेशाआधी तीन लेयरची सुरक्षा व्यवस्था असेल. सध्या भाविक अस्थायी चेकिंग पॉइंटमधून जातात. यात मेटल डिटेक्टर आणि मॅन्युअल फ्रिस्किंगची व्यवस्था आहे. लवकरच एक डझनपेक्षा जास्त सिक्योरिटी चेकिंग केबिन तयार होणार आहेत. यात अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन, मेटल डिटेक्टर्स आणि फ़्रीस्किंग मंदिरात प्रवेशाआधी केलं जाईल. शहरातील सगळ्या यलो झोनमध्ये सध्या यूपी पोलीस तैनात आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.