Baba bageshwar | बाबा बागेश्वर संतापून एका राजकारण्याला म्हणाले, ‘तू तर रावणाच्या खानदानातला’
Baba bageshwar | बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री इतके का संतापले? त्यांच्या रागावण्यामागे काय कारण आहे? बाबा बागेश्वर हे नेहमी चर्चेत असतात. ते प्रसिद्ध प्रवचनकार आहेत. 'तू तर रावणाच्या खानदानातला' असं ते एका राजकारण्याला म्हणाले.
जयपूर : बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचा मुलगा उदयनिधि स्टालिनवर हल्लाबोल केलाय. उदयनिधि स्टालिन रावणाच्या खानदानातील असल्याच बागेश्वर बाबा यांनी म्हटलं आहे. “उदयनिधिने आपल्या वक्तव्याने भारतातील सनातनी मानणाऱ्यांना दु:खी केलय. जो पर्यंत पृथ्वीवर पाणी आणि सूर्य आहे, तो पर्यंत सनातनी राहणार” बरेलीहून आलेल्या धमकीवर बागेश्वर बाबा आपल्या अंदाजात बोलले. राजस्थानच्या बारामध्ये आनंद गर्ग यांनी आयोजित केलेल्या कथेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके नेते उदयनिधि स्टालिन यांनी सनातन धर्माविरुद्ध टिप्पणी केली. सनातन धर्म समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे, असं उदयनिधि स्टालिनने म्हटलं होतं. हा धर्म संपवणच चांगलं राहिलं, असं उदयनिधि म्हणाला होता.
“उदयनिधिने सनातन धर्माची तुलना कोरोना व्हायरस, मलेरिया आणि डेंग्युशी केली होती. अशा गोष्टींना विरोध करु नये, थेट त्या नष्ट कराव्यात” असं उदयनिधिने म्हटलं. उदयनिधि स्टालिनच्या या वक्तव्याने भारतीय राजकारणात तीव्र पडसाद उमटले. यावरुन मोठा वादंग निर्माण झालाय. भाजपाच्या दिल्ली संघटनेच्या नेत्यांनी तामिळनाडू भवन इथे पोहोचून एक विरोधी पत्र सोपवलं. आपली नाराजी व्यक्त केली. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यामध्ये सहभागी होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालियन यांना उद्देशून हे पत्र आहे. राज्य सरकारचे चीफ रेजिडेंट कमिश्नरना हे पत्र सोपवलं.
इंडियाकडून कोणीच का बोललं नाही?
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सनातन धर्माबद्दल केलेल्या या टिप्पणीवर आपली भूमिका स्पष्ट करावी असं वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे. उदयनिधिच्या या वक्तव्यावर इंडियाकडून कोणीही टिप्पणी केलेली नाही. सगळे इतके शांत कसे?. साधु-संतांनी उदयनिधि स्टालिनच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. बाबा बागेश्वर महाराज यांनी उदयनिधीला रावणच्या खानदानातील असल्याच म्हटलं. इंडिया आघाडीची नुकतीच मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या बैठकीच यजमानपद भूषवलं. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी दोन दिवस ही बैठक चालली.