बाबासाहेबांकडूनही रामानुजाचार्यांच्या कार्याची दखल, काय म्हणाले होते आंबेडकर?; शहांनी दिला ऐतिहासिक संदर्भ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते रामानुजाचार्यांच्या मुर्तीचे अर्थात स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीचे (Statue of Equality) लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीला भेट दिली. यावेळी बोलताना शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून देखील रामानुजाचार्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते रामानुजाचार्यांच्या मुर्तीचे अर्थात स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीचे (Statue of Equality) लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीला भेट दिली. यावेळी बोलताना शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून देखील रामानुजाचार्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असल्याचे म्हटले आहे. यावेळी बोलताना शाह यांनी म्हटले की, हिंदुधर्मात समता आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले असतील तर ते रामानुजाचार्यांनी केले. त्यांनी केवळ प्रयत्नच केले नाही तर त्यांनी आपले विचार प्रत्यक्ष कृतीत देखील उतरवले. रामानुजाचार्य यांनी कांचीपूरम नावाच्या ब्राम्हण नसलेल्या व्यक्तीला आपला गुरू बनवून जागाल समानतेचा संदेश दिला. असा ऐतिहासिक दाखला बाबासाहेब आंबेकर यांनी दिला होता, असे शाह यावेळी म्हणाले.
रामानुजाचार्य यांनी समतेचा विचार दिला
पुढे बोलताना शाह यांनी म्हटले की रामानुजाचार्य यांनी खऱ्या अर्थाने समतेचा विचार दिला. देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी केवळ समानतेचा संदेशच दिला नाही तर तो व्यवहारात देखील आणला. त्यांनी त्यावेळी मंदिराचे 20 हिस्से केले आणि सर्व समाजाला मंदिराचे अधिकार दिले. त्यांच्यामुळेच आज हिंदू धर्मातील सर्व समाज हा आपण मंदिराशी जोडलेला पाहातो. त्यांनी हिंदू समाजातील सर्व जातींना देखील पुजेचा समान अधिकार दिला होता. काही लोकांना तेव्हा मंदिरात जाऊन पूजा करण्याचा अधिकार नव्हता या प्रथेमुळे रामानुजाचार्य दु:खी व्हायचे असे देखील शाह यांनी म्हटले आहे.
रामानुजाचार्य यांचे हिंदू धर्मासाठी मोठे योगदान
पुढे बोलताना शाह म्हणाले की, रामाणय महाभारतापासून ते आजपर्यंत सनातन धर्मात चढउतार आले. पण तरीही सनातन धर्म टिकून राहिला. जेव्हाही सनातन धर्मावर संकट आलं तेव्हा त्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. शंकराचार्यानंतर रामानुजाचार्यांनी मोठं काम केलं. आदी शंकराचार्याने सर्व मतमतांतरे एकत्र करून देशाला एकत्र केलं. सर्व मते एका छत्रछायेखाली आणले. रामनाजुचार्यांनी जीवन कवनाने सर्व देशाला सनातन धर्माशी जोडण्याचं काम केलं. कुरिवाज, कुप्रथा त्यांनी आपल्या कर्माने बदलल्या.
संबंधित बातम्या
वारकरी संप्रदाय आणि रामानुजाचार्याच्या सिद्धांताचा संबंध काय?; अमित शहांनी दिला दाखला