बांगलादेशी नेत्याची बालीश बडबड, भारताचा भूभाग ताब्यात घेण्याची भाषा…जाणून घ्या किती तासांत इंडियन आर्मी पूर्ण बांगलादेशवर मिळवणार ताबा
भारतीय लष्करासमोर बांगलादेशचे लष्कर टिकणार का? बांगलादेशाची सैन्याची शक्ती खूप कमकुवत आहे. 145 देशाच्या रॅकींगमध्ये बांगलादेश 37 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे भारताकडे जगातील चौथी सैन्य महाशक्ती आहे.
बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यापासून त्या देशांतील अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहे. हिंदूंना त्या देशातील कट्टरपंथी टार्गेट करत आहे. त्याचवेळी बांगलादेशातील राजकीय नेते बालीश बडबड करत आहे. बांगलादेश सरकारचे सल्लागार महफूज आलम यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी भारताच्या अनेक भूभागावर ताबा घेण्याची भाषा त्या पोस्टमध्ये केली आहे. त्यानंतर भारत सरकारने बांगलादेशकडे तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच बांगलादेशला कठोर इशारा दिला आहे. जर बांगलादेशीचे लष्कर भारतीय लष्कारासमोर आले तर किती तासांत त्यांचा पराभव होणार? जाणून घ्या भारतीय लष्कराची शक्ती…
बांगलादेश सरकारचे सल्लागार महफूज आलम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी भारताच्या भूभागावर ताबा घेण्याची भाषा केली आहे. त्यानंतर भारत सरकारने बांगलादेशला इशारा दिला आहे. या पद्धतीची वक्तव्य सहन केली जाणार नाहीत, असे भारताने म्हटले आहे.
भारतीय लष्करासमोर बांग्लादेश टिकणार?
भारतीय लष्करासमोर बांगलादेशचे लष्कर टिकणार का? बांगलादेशाची सैन्याची शक्ती खूप कमकुवत आहे. 145 देशाच्या रॅकींगमध्ये बांगलादेश 37 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे भारताकडे जगातील चौथी सैन्य महाशक्ती आहे. भारताकडे 14.44 लाख सैनिक आहे. जगात ही संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या तुलनेत बांगलादेशचे सैन्य काहीच नाही.
भारताची पॅरामिलिट्री फोर्स पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. भारताकडे पॅरामिलिट्री फोर्समध्ये 25 लाख 27 हजार सैनिक आहे. तसेच भारतीय लष्कराकडे 4,500 रणगाडे, 538 लढाऊ विमाने आणि सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. भारताकडे अण्वस्त्र आहे. भारत प्रत्येक बाबतीत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा खूपच पुढे आहे.
अशी आहे बांगलादेशची ताकद
बांग्लादेशकडे 1,75,000 सैनिक आहे. त्यात बॉर्डर गार्ड आणि तटरक्षक दलाचा समावेश आहे. बांगलादेश लष्कराकडे 13,100 वाहने आहेत. 281 रणगाडे आणि 30 ऑटोमॅटिक तोफा आहेत. तसेच 370 टो आर्टिलरी आणि 70 रॉकेट आर्टिलरी आहे. यामुळे आता तुम्हालाही लक्षात येईल की भारतीय लष्करापुढे किती तास बांगलादेशचे लष्कर टिकू शकेल.