Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Be Vocal for Local : लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा’, पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनतेला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (Be Vocal for Local).

Be Vocal for Local : लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा', पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 10:39 PM

नवी दिल्ली :देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं (Be Vocal for Local) खरेदी करावं. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तूंचा वापर करायचा आहे. याशिवाय लोकल वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमानही बाळगायचा आहे. लोकल उत्पादनाचा प्रसार करा”, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनतेला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (Be Vocal for Local).

“आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधीकाळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि ब्रँण्डींग केली. याशिवाय त्या वस्तूंप्रती अभिमान बाळगला. त्यामुळे ते वस्तू आणि लोकलहून ग्लोबल बनले. त्यामुळे दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तू खरेदी करुन त्याचा प्रचार करा. मला पूर्ण विश्वास आहे आपला देश असं करु शकतो”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

“कोरोना संकंटादरम्यान आपल्याला लोकल उत्पादन, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन याचंही महत्त्व समजलं आहे. संकंट काळात लोकलनेच आपली मागण्यांची पूर्तता केली आहे. आपल्याला या लोकलनेच वाचवलं आहे. लोकल फक्त गरजच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकलला आपला जीवनमंत्र बनवावंच लागेल, हे आता वेळेने आपल्याला शिकवलं आहे”, असं मोदी म्हणाले.

“हे संकंट इतकं मोठं आहे की, चांगल्यातली चांगली आणि मोठी व्यवस्थाही हादरली आहे. मात्र, याच परिस्थितीत देशाने गरिब भारतीयांची संघर्ष शक्ती बघितली आहे. या परिस्थितीत त्यांच्या संयमतेचंही दर्शन घडलं आहे. खासकरुन रस्त्यावर ठेला लावणारे, फेरीवाले, अनेक घरांमध्ये काम करणाऱ्या श्रमिक नागरिकांनी खूप सोसलं आहे. त्यांनी खूप त्याग केला आहे. प्रत्येकाला त्यांची कमी जाणवली. आपल्याला त्यांना सुदृढ बनवायचं आहे आणि आपलं हे कर्तव्य आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“याच गोष्टीचा विचार करुन गरिब, श्रमिक, स्थलांतरित मजूर, पशूपालक, मच्छिमार, संघटित क्षेत्रातील असो किंवा असंघटित क्षेत्रातील असो सर्वांसाठी आर्थिक पॅकजमध्ये महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे”, असं मोदींनी सांगितलं.

“भारताने ग्लोबल सप्लाय चेनमध्ये महत्त्वाची भूमिका निभवावी, याच गोष्टीचा विचार करुन आर्थिक पॅकेजमध्ये अनेक गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे. या पॅकेजमुळे प्रत्येक क्षेत्रातील वस्तूंच्या उत्पादनात गती मिळेल आणि गुणवत्ताही वाढेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या :

self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी

Aatm Nirbhar Bharat : पंतप्रधान मोदींनी सांगितले स्वावलंबी भारताचे पाच खांब

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार 

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.