पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यास सुरुवात करताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीये. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘२०१४ च्या आधी देश निराशेच्या छायेत गेला होता. या देशाचं काही होऊ शकत नाही असं लोकं बोलत होते. भारतीय हताश झाले होते. वर्तमानपत्रात घोटाळ्याच्या बातम्या असायच्या. रोज नवे घोटाळे उघडकीस होते. घोटाळेबाज लोकांचा हा काळ होता. सार्वजनिकपणे तो स्वीकारला पण जात होता. घर घेण्यासाठी गरिबांना लाच द्यावी लागत होते. गॅस घेण्यासाठी चकरा माराव्या लागत असे. मोफत राशन मिळत न नव्हते. त्यासाठी पण लाच द्यावी लागत होती.’
‘निर्दोश लोकं मारली जात होती. सरकार गप्प बसून असायची. आता आम्ही घरात घुसून मारतो. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करतो. दहशतवाद्यांना ही उत्तर देतो. देशातील प्रत्येक नागरिकाला आता माहित आहे की, भारत आपल्या सुरक्षेसाठी काहीही करु शकतो. ३७० कलम लागू असताना दगडफेक व्हायची, लोकं म्हणायचे जम्मू-काश्मीरचं काही होऊ शकत नाही. आता भारताच्या संविधानावर विश्वास ठेवत लोकं येथे मतदान करत आहेत.’
‘भारत आज १०वर्षात अशा स्थितीत पोहोचलो आहे की, भारताची स्वतासोबतच स्पर्धा आहे. मागील दहा वर्षात आम्ही जो वेग पकडलाय तो वेग आता आणखी वाढवणार आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात उंचावर घेऊन जावू. भारताची अर्थव्यवस्था १० वरुन ५ व्या स्थानावर आणली आहे. आता आम्ही अर्थव्यवस्थेला तिसऱ्या स्थानावर घेऊन जाऊ. दहा वर्षात आम्ही भारताला मोबाईल फोनचा उत्पादन बनवले आहे. आम्ही आधुनिक भारताजवळ जात आहोत. आम्ही चार कोटी गरिबांसाठी घरे बनवली आहेत. आता आणखी तीन कोटी घर बनवणार आहोत. १० वर्षात आम्ही देशातील महिलांना उद्योजक म्हणून पुढे नेलं आहे.’
‘आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही तीन पट अधिक गतीने काम करु. आम्ही तीन पट अधिक ताकद लावू. आम्ही तीन पट अधिक परिणाम आणून दाखवू. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येणं ही ऐतिहासिक घटना आहे. आम्ही शानदार विजय प्राप्त केला आहे. ओडिशामध्ये आम्ही भरपूर आशिर्वाद मिळवला आहे. आंध्रप्रदेशात एनडीएने आम्ही क्लीन स्वीप केले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये आम्ही विजय मिळवला आहे. जनतेचं प्रेम आम्हाला मिळत आहे. जनतेचे आशिर्वाद मिळत आहे. भाजपने केरळमध्ये खातं उघडलं आहे. तामिळनाडूमध्ये अनेक जागांवर भाजपने चांगली प्रगती केली आहे. कर्नाटक, यूपी आणि राजस्थानमध्ये भाजपची मतांची टक्केवारी वाढली आहे.’
‘महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहे. या तीन राज्यात लोकसभा निवडणुकीत आम्हाला मागच्या पेक्षा अधिक मते मिळाली आहे. पंजाबमध्ये ही आम्हाला चांगला आशिर्वाद मिळाला आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेससाठी देशाच्या जनतेने जनादेश दिला आहे की त्यांनी विरोधातच बसावे. तर्क संपले तर ओरडत बसा. काँग्रेसच्या इतिहासात लागोपाठ तीन वेळा काँग्रेस १०० च्या वर देखील गेली नाही. काँग्रेसच्या इतिहासात तिसऱ्यांदा सर्वात मोठा पराभव आहे.’