आयटी सिटीत एकीकडे पाण्याची टंचाई, दुसरीकडे पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी, मनपाने उचलले कठोर पाऊल
Bengaluru Water Crisis: होळी आणि रंगपंचमीसाठी बंगळूरमधील अनेक ठिकाणी रेन डान्स आणि पूल डान्सचे आयोजन केले जाणार होते. यासाठी कावेरीचे पाणी आणि बोअरवेलचे पाणी वापरणाऱ्यास बंदी आणली आहे. यामुळे पार्टीचे आयोजन करणाऱ्या हॉटेल, कल्ब, रिसोर्टने त्यांच्या यादीतून रेन डान्स काढून टाकले आहे.
भारतात आयटी सिटी म्हणून महाराष्ट्रातील पुणे शहराबरोबर कर्नाटकातील बंगळूर शहराची ओळख निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्यालय बंगळूरमध्ये आहे. आयटी सिटी असलेल्या बंगळूरमध्ये पाण्याची परिस्थिती भीषण झाली आहे. सॉफ्टवेअर अभियंत्याचे शहर असलेल्या बंगळूरमध्ये लोकांना अंघोळीला पाणी मिळत नाही. यामुळे अनेक कार्यालयात कर्मचारी कामावर जात नाही. पाण्याच्या समस्येचा बंगळूरमधील उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचवेळी दुसरीकडे पिण्याचे पाणी गाड्या धुण्यासाठी लोक वापरत आहेत. यामुळे बंगळूरमधील वॉटर सप्लाई अँड सीवरेज बोर्ड (BWSSB) आक्रमक झाला आहे. पाण्याचे अपव्यय करणाऱ्या 22 परिवारांकडून एका लाखापेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. बंगळूरमध्ये आता पाण्याचा अपव्यय करताना आढळ्यास पाच हजार रुपये दंड केला जात आहे.
सोशल मीडियाचा वापर करुन तक्रारी
BWSSB ने 22 परिवारांकडून 1.1 लाख रुपये दंड वसूल केला आहे. हे सर्व लोक गाडी धुणे, उद्यानांमध्ये पाणी टाकणे अशा कामांसाठी पिण्याचे पाणी वापरत होते. बोर्डाने पिण्याचा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्याचे काम सुरु केले आहे. पाणी वाया घालणाऱ्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून BWSSB कडे पाठवता येत आहे. त्याची दखल घेऊन कारवाई केली जात आहे. तसेच बोर्डने 1916 हा क्रमांक दिला आहे. यावर पाणी वाया घालवणाऱ्या लोकांच्या तक्रारी करता येणार आहे.
रेन डान्स अन् पूल डान्सवर बंद
होळी आणि रंगपंचमीसाठी बंगळूरमधील अनेक ठिकाणी रेन डान्स आणि पूल डान्सचे आयोजन केले जाणार होते. यासाठी कावेरीचे पाणी आणि बोअरवेलचे पाणी वापरणाऱ्यास बंदी आणली आहे. यामुळे पार्टीचे आयोजन करणाऱ्या हॉटेल, कल्ब, रिसोर्टने त्यांच्या यादीतून रेन डान्स काढून टाकले आहे.
बंगळूरचे संकट मुंबईत येण्याचा धोका
बंगळूरमध्ये पाण्याचे संकट सुरु आहे. परंतु या संकटातून धडा घेतला नाही तर तुमच्या, आमच्या शहरात हे संकट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबई शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. परंतु मुंबईत नैसर्गिक जलसंसाधने पुरेशी नाहीत. वेगाने होणारे शहरीकरण आणि लोकसंख्येच्या विस्फोटामुळे बंगळूरमधील संकट मुंबईत येण्याचा धोका आहे.