तिचं शिक्षण मुंबईत, नोकरीला लाथ, 10 हजारात बिझनेस सुरू, आता टर्नओव्हर कोटीत; वाचा प्रेरणादायी बातमी!

तुम्ही कुठे जन्माला आलात? तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात? तुमच्याकडे किती पैसे आहेत? यावर तुमचं यश अवलंबून नसतं. तर, तुमची कष्ट घेण्याची तयारी किती आहे?, तुमच्यात आत्मविश्वास आहे का? यावर तुमचं यश अवलंबून असतं. (Bengaluru Lady Starts Business in Garage With Rs 10,000, now making crores)

तिचं शिक्षण मुंबईत, नोकरीला लाथ, 10 हजारात बिझनेस सुरू, आता टर्नओव्हर कोटीत; वाचा प्रेरणादायी बातमी!
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 4:05 PM

बेंगळुरू: तुम्ही कुठे जन्माला आलात? तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात? तुमच्याकडे किती पैसे आहेत? यावर तुमचं यश अवलंबून नसतं. तर, तुमची कष्ट घेण्याची तयारी किती आहे?, तुमच्यात आत्मविश्वास आहे का? यावर तुमचं यश अवलंबून असतं. जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी या भांडवलावरच बेंगळुरू येथे राहणाऱ्या एका महिलेने उत्तुंग भरारी घेतली आहे. चालू नोकरीला लाथ मारून व्यवसायात उतरण्याच्या तिच्या धाडसाची कहानी वाचून तुम्हीही थक्क व्हाल. (Bengaluru Lady Starts Business in Garage With Rs 10,000, now making crores)

नीता अदप्पा असं या महिलेचं नाव आहे. नीता यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि आज त्या बिझनेसमध्ये लाखो रुपये कमावत आहेत. नीता यांनी अवघ्या दहा हजार रुपयात त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. या दहा हजार रुपयांच्या बळावर आज त्या कोट्यवधीचा व्यवसाय करत आहेत.

मुंबईत शिक्षण, बेंगळुरूत व्यवसाय

नीता या साधारण कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांचे वडील एका हर्बल प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीत सेल्स मॅनेजर होते. नीता यांनी मुंबईतील एका महाविद्यालयातून फार्मसीमध्ये मास्टर्सची डिग्री घेतली. त्यानंतर पुढचं शिक्षण घ्यावं, शिक्षणासाठी परदेशात जावं किंवा नोकरी करावी हे तीन पर्याय त्यांच्ंयाकडे होते. त्यांनी तिसरा पर्याय निवडत नोकरीस सुरुवात केली. पण नोकरीत त्यांचं मन रमलं नाही आणि अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी नोकरीला रामराम केला. त्यानंतर त्यांनी बेंगळुरूत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

काय आहे बिझनेस आयडिया?

1995मध्ये स्त्रियांनी नोकरी सोडून काम करणं तसं शक्य नव्हतं. कारण त्या काळात संधी खूप कमी होत्या. तरीही नीता यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून त्यांचा व्यवसाय वाढवला. त्यांनी या काळात प्रकृती हर्बल नावाने कंपनी सुरू केली. यावेळी त्यांना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण अनिशा देसाई यांनी साथ दिली. दोघींनीही हेअर केयर, स्क्रीन प्रॉडक्ट्सवर बरंच संशोधन करून 10 हजार रुपये गुंतवून व्यवसायाला सुरुवात केली.

असा झाला व्यवसाय सुरू

बाजारात हेअर केअर आणि स्किन केअर उत्पादने भरपूर आहेत. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी खास पद्धत वापरली. त्यांनी सुरुवातीला केवळ हॉटेलांना टारगेट केलं. सुरुवातीला त्यांना बंगळुरूच्या छोट्या हॉटेलमधून ऑर्डर मिळायला लागले. मात्र, त्यावर त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पंचतारांकीत हॉटेलांकडेही मोर्चा वळवला. तिथूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यांची उत्पादने या पंचतारांकीत हॉटेलातही जाऊ लागले. त्यामुळे त्यांचा बिझनेस आपोआपच वाढला. (Bengaluru Lady Starts Business in Garage With Rs 10,000, now making crores)

असा वाढला व्यवसाय

हॉटेल सेक्टरमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी 2011मध्ये रिटेल मार्केटमध्ये पाऊल ठेवलं. यापूर्वी त्यांनी त्यांचा व्यवसाय केवळ हॉटेलांपर्यंतच मर्यादित ठेवला होता. त्यातूनही त्यांना चांगला लाभ मिळत होता. त्यानंतर त्यांनी फेस स्क्रब, हेअर मास्क, हेअर ऑयल, शँम्पू, कंडिशिनर प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली. 180 रुपये ते 300 रुपयांपर्यंत हे प्रॉडक्ट विकले जात होते. सध्या त्या त्यांची उत्पादने ऑनलाईनद्वारे विकत आहेत. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह स्वत:च्या संकेतस्थळावरूनही त्या ही उत्पादने विकत आहेत. (Bengaluru Lady Starts Business in Garage With Rs 10,000, now making crores)

संबंधित बातम्या:

मृतदेहाला कुणी हातही लावत नव्हतं, लेडी सब इन्स्पेक्टर 2KM पर्यंत खांद्यावर घेऊन चालली, वाचा संपूर्ण बातमी

पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी

100 वर्षात असा बजेट पाहिला नाही; अमृता फडणवीस ट्रोल

(Bengaluru Lady Starts Business in Garage With Rs 10,000, now making crores)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.